
Mumbai, 07 January : बीडचं बिघडलेले राजकीय पर्यावरण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुधारतील, असं एकंदरीत सध्याचं वातावरण दिसतंय. ते दोघे सुधारणार असतील तर त्यांना माझी सर्वस्वी साथ राहील, अशा शब्दांत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे बीडच्या पालकमंंत्रिपदाबाबत भाष्य केल्याचे मानले जात आहे.
कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयात मुंबईतील पर्यावरणाच्या संदर्भाने माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांना बीडच्या राजकीय पर्यावरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या खून प्रकरण आणि बीडच्या राजकीय वातावरणाबाबत भाष्य केले. बीडचे पालकमंत्रिपद ( Beed Guardianship) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी स्वीकारावे, अशी मागणी होत आहे, त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचे हे विधान महत्वपूर्ण ठरते.
मुंबईचं पर्यावरण तुम्ही सुधारलं. पण बीडचं बिघडलेलं राजकीय पर्यावरण कोण सुधारणार, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे बीडचं राजकीय वातावरण सुधारतील, असे सध्याचं वातावरण आहे, असे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या, बीडचे राजकीय पर्यावरण बिघडलं, असं म्हणायला माझं मन जड होतं. कारण मी राज्यभरातील घटनांचा आढावा घेते. त्यावरही आपण कधीतरी बोलू. पण, ते बिघडविण्याचा प्रयत्न जे करत आहेत, त्यांना पाठीशी घालू नये, अशी आमची अपेक्षा नेत्यांकडे आहे.
पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमक्या आल्या, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. त्याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, अंजली दमानिया, तुम्हाला जे कोणी धमक्या देत आहेत. त्यांची तक्रार करा. महिला आयोगाकडे कारवाई करण्यासंदर्भात मी विनंती करते. पण ते माझे कार्यकर्ते आहेत, असं म्हणण्याचे काही कारण नाही. तसं म्हणणं माझ्यावर अन्याय आहे. कारण या विषयात माझा कुठेही दुरान्वये कुठेही संबंध नाही.
त्या म्हणाल्या, अंजली दमानिया यांना जर कोणी असं बोलत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांनीही माझं नाव घेताना जेवढी माहिती आली त्याच्या आधारावर न बोलता थोडासा विचार करावा. आमचं काय म्हणणं आहे, तेही पाहावं. त्यांनी जे कोणी बोलले आहे, ते माझेच कार्यकर्ते कसे, असा सवालही पंकजा मुंडे यांनी उपस्थित करत ते माझे कार्यकर्ते असतील, तर त्यांनाही शिक्षा करा. पण, माझ्यासाठी कोणी बोलत असेल तर ते माझे मत असू शकत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.