EKnath shinde News : मनोज जरांगेंच्या 'मुंबई चलो'च्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

Maratha Reservation : सुप्रीम कोर्ट २४ जानेवारीला क्युरेटिव्ह पिटीशन ऐकणार आहे. ही पिटीशन फेटाळली
Eknath Shinde News, Aurangabad
Eknath Shinde News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे यांना दिला आहे. २० जानेवारीपासून हे आंदोलन होणार. मुंबईच्या दिशेने तीन कोटी मराठे चालत येतील, असं ठणकावून मनोज जरांगे यांनी बीडच्या जाहीर सभेतून सांगितले. या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रीम कोर्ट २४ जानेवारीला क्युरेटिव्ह पिटीशन ऐकणार आहे. ही पिटीशन फेटाळली जाईल असे म्हटले जात होते. मात्र, न्यायालय ती ऐकणार असल्याने मराठा आरक्षणासाठी मोठा दिलासा आहे. २४ जानेवारीला तज्ज्ञ वकिलांची फौज न्यायालयात बाजू मांडेल. मराठा समाज कसा मागास आहे, हे सांगेल. संयम ठेवा, मराठा समाजाला न्याय मिळेल, असेआवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.

Eknath Shinde News, Aurangabad
Maratha Reservation : ‘मी कोणत्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही, हीच सरकारची मोठी अडचण’

महाविकास आघाडीमुळे आरक्षण गेले असा ठपका देखील एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर ठेवला. न्यायालयात जसे पुरावे मांडायला हवे होते तसे मांडले गेले नाही. पण यावेळी आम्ही फूलप्रुफ बाजू मांडू. तज्ज्ञ वकिल बाजु मांडतील. सत्ताधारी,विरोधक सर्वांचेच मत आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे शांततात सुव्यव्यस्था राहिली पाहिजे, असे म्हणत मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील यांनी आपल्या बीडच्या सभेतून सरकाला इशारा दिला आहे. २० जानेवारीला ते मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यासाठी तीन कोटी मराठे मुंबईत येतील, असे देखील जरांगे म्हणाले. आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी छगन भुजबळ यांनी टार्गेट करत येवल्याचा येडपट म्हणून उल्लेख केला. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असे देखील जरांगे म्हणाले.

(Edited By Roshan More)

Eknath Shinde News, Aurangabad
Maratha Reservation : मनोज जरांगेंचा बीडच्या सभेतून मराठा लोकप्रतिनिधींना सूचक इशारा, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com