CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरेंवर केलेले 'हे' 10 गंभीर आरोप...

Nagpur Assembly Winter Session : आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंचे नाव न घेता धू-धू धुतले. तसेच त्यांच्या काळातील घोटाळ्यांची यादीच मांडली.
Eknath Shinde and Uddhav Thackeray
Eknath Shinde and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. शिंदेंनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर एकापाठोपाठ एक अशी आरोपांची माळच लावली. कधी टोले तर कधी टीकेचे तिखटवार अशा पध्दतीने शिंदेंनी ठाकरेंना घायाळ केले. त्यांनी कोरोना काळातील मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांवरही बोट ठेवले.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) बोलण्याची एकही संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडली नाही. आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता धू-धू धुतले. मुख्यमंत्र्यांनी घोटाळ्यांची यादीच मांडली.आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाच्या टेंडरचा पाऊस पडला असल्याचे सांगत सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी अशी खोचक टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Eknath Shinde : 'चाहिए पैसा, निकालो मोर्चा'; मुख्यमंत्री शिंदेंनी काढले वाभाडे

आपल्या भाषणात शिंदेंनी महापालिकेतील घोटाळ्यांपासून ते कोरोना काळात एकाच व्यक्तीला टेंडर कसे मिळायचे, याची दाखले देत मातोश्री एक ते मातोश्री दोन हा तुमचा प्रवास अभिमानास्पद आहे. तसा धारावीकरांचा प्रवास धारावी एकपर्यंत तरी व्हावा,असा टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला.(Nagpur Winter Session)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केलेले 'हे' 10 गंभीर आरोप...

* कोरोना काळात लोकं मरत होते, भीतीच्या वातावरणात जगत होते, तेव्हा हे लोकं पैसे खात होते.

* सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी...; धारावी पुनर्विकासाची निविदा का रद्द केली, विशेष लोकांना काम देण्यासाठीच टेंडर रद्द....

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

* आदित्य राजाच्या कृपेने वरुन राजाच्या टेंडरचा पाऊस पडला.

* रेमडिसिवीरच्या कंत्राटात मोठा गैरव्यवहार, जनतेला लुबाडलं आणि स्वत:ची घरं भरली...

* कोविड काळात जो भ्रष्टाचार झाला त्या प्रकरणातील एक महत्वाचे प्यादे हे याची सुरुवात जिजामाता उद्यान येथील पेंग्विनपासून सुरु झाली.

*मुंबईत कोविड काळात जो भ्रष्टाचार झाला. त्याची एकेक सुरस कथा आहेत.अरेबियन नाईट यालाही मागे टाकले अशा या कथा आहेत.त्याची चौकशी सुरु आहे.लवकरच त्यातील सत्य बाहेर येईल

* जिथे टेंडर तिथे सरेंडर असा प्रवास सुरू

* माझं कुटुंब माझी जबाबदारी असताना लोकं जगण्यासाठी धडपडत होती.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Kalyan Banerjee video : संसदेच्या पायऱ्यांवर घडलं पण संजय राऊतांनी नाही पाहिलं...

* आरोग्य व्यवस्था रस्त्यावर असताना घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबरचा सीएम आहे हे दाखवू नये.घरात बसून एक नंबर कसे होतात असा सवाल करताना तो नंबर पुढून नाही,तर शेवटून होता...

* सुजित पाटकर (Sujit Patkar) यांनी त्यांच्या लाईफलाइन हॉस्पिटलच्या माध्यमातून खूप काही लुटले. याठिकाणी रुग्ण काल्पनिक होते. तर काल्पनिक डॉक्टर होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Maharashtra Assembly Winter Session 2023 : देशातील सर्वात अत्याधुनिक हिरे व्यापार केंद्र सुरतेत नाही मुंबईत; फडणवीसांनी काय सांगितले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com