Eknath Shinde On Amit Shah : अमित शाहांचा 'तो' दावा; CM शिंंदेंनी एकाच वाक्यात विषय संपवला; म्हणाले, '2029 ला अजून...'

Amit Shah On Maharashtra Government : येत्या निवडणुकीत महायुतीची सत्ता येणार. पण 2029 सालच्या विधानसभा निवडणुकीत एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची आहे, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केल्यानंतर आता त्यावर महायुतीतील घटक पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Eknath Shinde On Amit Shah : अमित शाहांचा 'तो' दावा; CM शिंंदेंनी एकाच वाक्यात विषय संपवला; म्हणाले, '2029 ला अजून...'
Published on
Updated on

Mumbai News : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी 2029 साली भाजप पक्ष एकट्याने सत्ता स्थापन करेल असा दावा केला आहे. या दाव्यानंतर महाराष्ट्रासह महायुतीच्या गोटातही खळबळ उडाली आहे. तसेच राजकीय नेतेमंडळींकडून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

अमित शाह(Amit Shah) यांच्या या वक्तव्यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँँग्रेसचं टेन्शन वाढवलं आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सीएम शिंदे म्हणाले, 2024 मध्ये महायुतीचे सरकार येईल. 2029 ला अजून वेळ आहे, असं उत्तर देत एकाच वाक्यात विषय संपवला आहे.तर दुसरीकडे अजितदादा यांनी महाराष्ट्रात कुणा एका पक्षाचं सरकार येऊच शकत नाही, असं म्हटलं आहे.

कोल्हापुरातील कण्हेरी मठ येथे संत समावेश या कार्यक्रमाप्रसंगी आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) माध्यमांशी बोलत होते. शिंदे म्हणाले, सव्वा दोन वर्षांत केलेल्या विकासावर दिलेल्या पायाभूत सुविधांवर आम्ही भर देणार आहे. कल्याणकारी आणि विकास याची सांगड घालण्याचा काम केले, याची पोचपावती जनता देईल. त्यामुळे महायुती सरकार प्रचंड मताधिक्याने आणि बहुमताने पुन्हा सत्तेत येईल. 2024 ला महायुतीचे सरकार येईल, 2029 ला अजून वेळ आहे.

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दहा वर्षांचे काम केले. ते मागील 50-60 वर्षांत काम दाखवा. आज विकास आणि कल्याणकारी योजना निर्माण होत आहेत.गरीब लोकांना मोफत धान्य आणि 35% लोकांना गरीबीतून बाहेर काढले त्यामुळे अमित शाहांनी जो विश्वास दाखवला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्व संत, अध्यात्मिक पंत एकत्र येऊन चांगला कार्यक्रम झाला. अध्यात्मिक सोबत पर्यावरण संदर्भात पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रम झाला. आजदेखील पर्यावरण, तापमान वाढसारखे प्रश्न भेडसावत आहेत. त्यामुळे समाजाची गरज ओळखून स्वामी कडसिद्धेश्वर यांनी कार्यक्रम घेतले. आजच्या कार्यक्रमात येऊन आनंद झाला. सर्व पंतांना एका छताखाली आणण्याचे काम करून धर्म जागरण केले. समाजाला दिशा देण्याचे काम हे संत मंडळी करत असतात.अशा पद्धतीची प्रबोधन कार्यक्रम समाजासाठी आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वोट जिहाद या वक्तव्यावर बोलताना,धर्मजागरण सभा करत असताना इतर धर्माचा द्वेष मत्सर कोणी करत नाही. हिंदू धर्माचा विचार आणि धर्मरक्षण करणे इथे प्रत्येकाची जबाबदारी आहे. काही लोक समाजा-समाजामध्ये द्वेष पसरवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतात. त्याला योग्य उत्तर या संत समावेश कार्यक्रमातून मिळाले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे प्रकारच्या योजना ह्या कीर्तन प्रबोधनातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असेही शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादीच्या कॅम्पेनवरून बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली आहे. महाराष्ट्रातील जनतेला ज्या लोकांनी इतके वर्ष झुलवत ठेवले, केवळ त्यांनी जनतेच्या मतांचा वापर केला. त्यावर सत्ता भोगली त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आमचं काम आणि त्यांचं काम तुलना करा आणि मग बोला. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आणि समजदार आहे कोणाचे सरकार हे जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे हे माहिती आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार बहुमताने विजयी होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Eknath Shinde On Amit Shah : अमित शाहांचा 'तो' दावा; CM शिंंदेंनी एकाच वाक्यात विषय संपवला; म्हणाले, '2029 ला अजून...'
Goa Politics : CM सावंत, विश्वजीत राणे यांच्यातील वाद शाहांच्या दरबारी! दिल्लीच्या बैठकीत नक्की काय घडलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com