Pune Politics : भाजपने पुण्यातील 2 मतदारसंघावरील दावा सोडला, इच्छुकांचं काय होणार?

Pune BJP News : विधानसभेसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली. मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अशाच प्रकारच्या प्रक्रियेचा अवलंब करत उमेदवार ठरवले होते. हाच प्रयोग भाजप महाराष्ट्रात देखील राबवत आहे.
Jagdish Mullik, Sunil Tingre, Nana Bhangire, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Jagdish Mullik, Sunil Tingre, Nana Bhangire, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 02 Oct : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने वडगाव शेरी आणि हडपसर (Hadapsar) मतदारसंघावरील आपला दावा सोडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काल मंगळवारी पक्ष निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या मतदान प्रक्रियेतून वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघ वगळल्यामुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत.

विधानसभेसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली. मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अशाच प्रकारच्या प्रक्रियेचा अवलंब करत उमेदवार ठरवले होते. हाच प्रयोग भाजप महाराष्ट्रात देखील राबवत आहे.

हाच प्रयोग भाजप महाराष्ट्रात देखील राबवत आहे. यासाठी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या मतदानाची प्रक्रिया पार पाडली. मात्र, यातून वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघ वगळल्यामुळे हे दोन मतदारसंघ भाजपने (BJP) मित्र पक्षाला सोडल्याची चर्चा सुरी झाली आहे. भाजपचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी निरीक्षक पुण्यात असूनही त्यांनी हडपसर आणि वडगाव शेरीत बैठका घेतल्या नसल्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.

Jagdish Mullik, Sunil Tingre, Nana Bhangire, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Amit Shah : मित्रपक्षांना जिंकवा, असे सांगण्याची वेळ अमित शाह यांच्यावर कुणी आणली?

तर हडपसर मतदारसंघ ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला (Shivsena) सुटण्याची शक्यता आहे. या ठिकाणाहून नाना भानगिरे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे शिवसेनेने या मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. तर वडगाव शेरीमधून विद्यमान आमदार सुनील टिंगरे पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

Jagdish Mullik, Sunil Tingre, Nana Bhangire, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Chandrakant Patil : प्रकाश आबिटकर, मी... आम्ही कामगारांची मुलं आमदार अन् मंत्री झालो, हेच काँग्रेसचं दुखणं!

त्यामुळे आता या मतदारसंघातून जगदीश मुळीकांचा (Jagdish Mulik) पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जर भाजपने या मतदारसंघावरील आपला दावा सोडला तर पक्षांतर्गत नाराजीला देखील भाजपला सामोरं जावं लागू शकतं.

कारण मागील अनेक दिवसांपासून जगदीश मुळीक यांनी वडगाव शेरी मतदारसंघात जोरदार तयारी सुरु केली होती. मात्र, आता पक्षाने या मतदारसंघावरील दावा सोडल्यामुळे मुळीक काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com