BMC elections 2025 : मुख्यमंत्री फडणवीसांनी BMC निवडणुकीबाबत दिली मोठी अपडेट; महायुतीचा थेट फॉर्म्युलाच सांगितला

Fadnavis Mahayuti strategy News : बीएमसी निवडणूक महायुती एकत्रित लढणार आहे. त्यासोबतच महायुतीमधील तीन पक्षाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे स्पष्ट करीत जागावाटप हे प्रत्येक पक्षाच्या ताकदीवर अवलंबून असेल, असे मोठे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिकेची निवडणूक दिवाळीनंतर जाहीर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्षाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. निवडणुकीसाठी दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने सर्वत्र निवडणुकीची लगबग सुरु आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या घोषणेकडे लागले असतानाच सीएम देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. बीएमसी निवडणूक महायुती एकत्रित लढणार आहे. त्यासोबतच महायुतीमधील तीन पक्षाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे स्पष्ट करीत जागावाटप हे प्रत्येक पक्षाच्या ताकदीवर अवलंबून असेल, असे मोठे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

बीडीडी चाळींच्या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी एका वृत्तावाहिनीशी बोलताना बीएमसी निवडणुकीबाबत माहिती दिली. येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीच्या कामाला सर्वच पक्ष लागले आहेत. येत्या काळात होत असलेली मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती एकत्रित लढणार आहे. त्यासाठी भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Shivsena Politics : शिवसेनेचा मनसेला मोठा दणका, शहराध्यक्ष फोडला; चार माजी नगरसेवकांनी बांधले 'शिवबंधन'

'2017 सालच्या निवडणुकीत भाजपकडे (BJP) 82 नगरसेवक होते. तर, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपचे 15 आमदार निवडून आले. जे इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील. मात्र, प्रत्येक पक्ष किती जागांवर लढणार हे त्यांच्या ताकदीवर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
NCP News : धाराशीव राष्ट्रवादीची धुरा कोणाच्या खांद्यावर ? अजित पवार भाकरी फिरवणार? की जुनाच चेहरा देणार..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये तीन टप्प्यांत होतील, असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेसाठी टप्याटप्याने मतदान होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
BJP Politics : पक्षाचं उघडलं दार पण कार्यकारिणीचं बंदच ठेवलं, बडगुजरांना भाजपने थोडं दूरच ठेवलं..काय कारण?

'काही मराठी माणसांनी मुंबई सोडली. तो दुरच्या भागात स्थायिक जरी झाला असला तरी, बीडीडी चाळीचे पुनर्वसन करत मराठी माणसाला घर देण्यात आले आहे. त्यांना ५०० चौरस फूट फ्लॅट देण्यात आला आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Solapur Maha Aghadi Dispute: जाहीर सभेत कान टोचताच सोलापुरातील काँग्रेस नेत्यांनी घेतली ठाकरेंची भेट; ठाकरेंना दिला ‘हा’ शब्द...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com