Ambernath Politics : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. ठाकरे बंधू एकत्र येत असताना त्याचा फटका एकनाथ शिंदेंना बसणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, शिंदे देखील अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी मनसेच अंबरनाथ शहराचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक कुणाल भोईर यांना शिवसेनेत घेत मनसेला मोठे खिंडार पाडले आहे. या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ विभागातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली आहे.
कुणाल भोईर यांच्यासह मनसेचे जिल्हा संघटक व माजी नगरसेवक संदीप लकडे, शहर संघटक व माजी नगरसेवक स्वप्नील बागुल, माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर, विभाग अध्यक्ष चंद्रकांत चौघुले, महेश सावंत, प्रशांत भोईर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच अंबरनाथ शहरातील मनसेचे उपविभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, पदाधिकारी आणि अनेक मनसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिने शिवसेनेने मनसेला खिंडार पाडून आपली ताकद वाढवली आहे. कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आहे. त्यांना मनसेची ताकद मिळाली असतील तर आगामी निवडणूक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जड केली असतील त्यामुळे रणनीती आखत मनसेला खिंडार पाडण्याचे काम शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आले.
मनसेसोबतच इतर पक्षांतूनही शिवसेनेत इन्कमिंग झाले. कल्याण पश्चिमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेउमेश बोरगावकर, वॉर्ड अध्यक्ष गोरख साबळे, महिला वॉर्ड अध्यक्ष उषा गोरे, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे टिटवाळा उपशहरप्रमुख श्रीधर दादा खिस्मतराव, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर मडवी, उपविभाग प्रमुख प्रशांत मोहिते, उपशाखा प्रमुख गजानन पाटील आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सदस्यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
अंबरनाथमधील तब्बल चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. प्रवेश केलेले माजी नगरसेवक हे ठेकदार आहेत. अडकलेली बिलं काढण्यासाठी ते गेले असतील. ते वॉर्डाच्या नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी गेले असून ज्यांना पक्षाने मोठं केलं त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली, असे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.