Solapur Maha Aghadi Dispute: जाहीर सभेत कान टोचताच सोलापुरातील काँग्रेस नेत्यांनी घेतली ठाकरेंची भेट; ठाकरेंना दिला ‘हा’ शब्द...

Maharashtra Assembly Election 2024 : उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या कान टोचल्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी त्यांची भेट घेऊन आम्ही आघाडी धर्माचे पालन करत असल्याचे सांगितले.
Uddhav Thackeray-Praniti Shinde-Chetan Narote
Uddhav Thackeray-Praniti Shinde-Chetan NaroteSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 11 November : सोलापुरातील सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्या खासदार प्रणिती शिंदे यांचे जाहीररित्या कोन टोचले. त्यानंतर आज सकाळीच काँग्रेस नेत्यांनी धावत पळत जाऊन ठाकरे यांची भेट घेतली. ‘आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळला असून खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते लवकरच शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होतील,’ असे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी ठाकरेंच्या भेटीनंतर सांगितले.

सोलापूर दक्षिण मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हेही इच्छुक होते. त्यांचे नावही काँग्रेसकडून उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र, पक्षाकडून त्यांना शेवटपर्यंत एबी फार्मच देण्यात आला नव्हता.

सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते हे अमर पाटील यांच्या प्रचाराच्या ऐवजी काडादींच्या प्रचारात दिसत आहेत. याशिवाय अमर पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभाच्या सभेला निमंत्रण देऊनही खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde), शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दांडी मारली होती.

Uddhav Thackeray-Praniti Shinde-Chetan Narote
Uddhav Thackeray: प्रणिती, तू आता शिवसेनेच्या प्रचारात उतरलं पाहिजे; उद्धव ठाकरेंनी कान टोचले

अमर पाटील यांच्या प्रचारातून काँग्रेसने अंग काढून घेतल्याचे दिसून येताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला. त्यासाठी त्यांनी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची आठवण करून देत आघाडी धर्मानुसार शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरेंनी सभेतच जाहीररित्या कान टोचल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आज ठाकरेंची भेट घेतली.

उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या कान टोचल्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी त्यांची भेट घेऊन आम्ही आघाडी धर्माचे पालन करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाकडून दिलीप माने यांना पक्षाचा एबी फार्म आला होता. मात्र, काँग्रेस तो त्यांना दिला नाही. पक्षाने आघाडी धर्म पाळला आहे, हे सांगितल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले ‘गुड, तुम्ही लढा. आम्ही तुमच्यासोबत आहे. तुम्ही सर्वांची बैठक घ्या आणि आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावा, असे त्यांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांना आदेश दिला आहे.

Uddhav Thackeray-Praniti Shinde-Chetan Narote
Uddhav Thackeray Speech : ‘कटेंगे तो बटेंगा’ला उद्धव ठाकरेंचे खणखणीत उत्तर...‘हम महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो को बाटेंगे’

सोलापुरात आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करणार आहोत. आम्ही काँग्रेस पक्षाकडून आलेला एबी फार्म दिलीप माने यांना न देता आघाडीचा धर्म पाळतोय. दिलीप माने यांनी अपक्ष भरलेला अर्जही काढून घेतला आहे. आघाडीची धर्म आम्ही पाळलेला आहे. मी आणि भगीरथ भालके ठाकरेंना भेटलो असून प्रणिती शिंदेही लवकरच प्रचारात सहभागी होतील, असा विश्वासही नरोटे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com