अरुण हलदरांची तक्रार राष्ट्रपतींकडे करणार : नवाब मलिक

अरुण हलदर (Arun Halder) यांनी वानखेडें (Sameer Wankhede) यांच्या घरी जाऊन कागदपत्रे तपासली. त्यांना ही कागदपत्रे तपासणीचा अधिकार नाही. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
नवाब मलिक
नवाब मलिक सरकारनामा
Published on
Updated on

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप करीत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर (Arun Halder) यांच्यावर निशाणा साधला. काल वानखेडेंच्या कुटुंबियांनी खोटी कागदपत्रे दाखविली, असा आरोप मलिकांनी केला आहे. अरुण हलगर यांच्यासारखी संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती वानखेडेंना क्लीनचीट कशी देऊ शकते, असा प्रश्न मलिक यांनी यावेळी उपस्थित केला.

''अरुण हलदर (Arun Halder) यांनी वानखेडें (Sameer Wankhede) यांच्या घरी जाऊन कागदपत्रे तपासली. त्यांना ही कागदपत्रे तपासणीचा अधिकार नाही. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अशा प्रकरणातील कागदपत्रे तपासण्याचा अधिकार अरुण हलगर यांना नाही. याबाबत आम्ही सामाजिक न्यायविभागाकडे आणि राष्ट्रपतीकडे तक्रार करणार आहोत,'' असे मलिक यांनी यावेळी सांगितलं

''अरुण हलदर (Arun Halder)त्याचे वर्तन संशयास्पद आहे. त्यांची चैाकशी झाली पाहिजे. काल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत काल वानखेडेंचे कुटुंबाने भेट घेतली. त्यावेळी माझ्यावर काही आरोप करण्यात आले. पण मी वानखेडेच्या दुसऱ्या पत्नीची नाव घेतलेले नाही. त्यांच्या मुलाचे नाव घेतलं नाही. मी कोणतीही व्यक्तीगत टीका केली नाही,'' असे मलिक यांनी यावेळी सांगितलं.

नवाब मलिक
सहकारमंत्र्यांनी भर सभेत बँक व्यवस्थापकांना सुनावले

''गेल्या नऊ महिन्यापासून माझा जावायाला चुकीच्या पद्धतीने अडकविलं. आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. भाजपच्या अनेक नेत्याचे ड्रग्ज पेडलरसोबत संबंध आहे. माझ्यावर अँट्रासिटीचा गुन्हा करण्याची धमकी दिली जात आहे,'' असे मलिक म्हणाले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याबाबत दररोज नवीन खुलासे करीत आहेत.

मलिक यांनी काल एक फोटो टि्वट केला आहे. या फोटोतील व्यक्ती कोण असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे, त्यांची बहिण वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा केला आहे. यास्मिन वानखेडे यांचे अब्दुल अझिज खान यांच्यासोबत लग्न झाले होते. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या निकाहनाम्यावर अब्दुल अझीज यांचे नाव आहे. मलिक यांनी टि्वट केलेला फोटो हा अब्दुल अझिज यांचा असल्याचे समजते.

आर्यन खानबाबत सुळे म्हणाल्या, ''जे घडलं ते आई म्हणून वाईट वाटत..''

पुणे : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याची काल जामिनावर मुक्तता झाली. २६ दिवसानंतर ऑर्थर रोड कारागृहातील मुक्कामानंतर तो घरी परतला आहे. त्याच्यावरील कारावाईवरुन राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपावर भाजपच्या काही नेत्यांनी मलिकांवरही आरोपाचे खंडन केले आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ''आर्यन खान (Aryan Khan) बाबत मीडिया ट्रायल व्हायला नको होती,' असे त्या म्हणाल्या. ''आर्यन खान बाबत जे घडलं आई म्हणून वाईट वाटत,'' असे सुळे म्हणाल्या. जांभुळवाडी येथील रोजगार मेळाव्यात त्या बोलत होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com