Devendra Fadnavis News : केंद्रातील भाजपाच्या मदाऱ्यांनी फडणवीसांचा 'अडवाणी' केला ; काँग्रेसच्या 'या' नेत्यानं डिवचलं

BJP Vs Congress News : देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन,’असं म्हणत होते.मात्र...
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचा राज्यातील प्रमुख चेहरा मानला जातो. महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचत राज्यात महायुतीचे सरकार आणण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच त्यांना महायुतीचे शिल्पकार देखील म्हटले जाते.याच फडणवीसांना मागील काही दिवसांपासून आघाडीच्या नेतेंमडळींकडून लक्ष्य केले जात आहे.याचदरम्यान,आता काँग्रेसच्या कन्हैय्या कुमारांनी देखील फडणवीसांना डिवचलं.

काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी मुंबई येथे मीडियाशी संवाद साधला. त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करतानाच उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला.ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) ‘मी पुन्हा येईन,’असं म्हणत होते.मात्र केंद्रातल्या भाजपच्या मदाऱ्यांनी त्यांचा अक्षरश: ‘अडवाणी’ केला आहे असल्याचे म्हणत खोचक टोला लगावला.

Devendra Fadnavis News
Manoj Jarange hunger Strike : आरक्षणाच्या भूमिकेवर जरांगे ठाम ; थरथरत्या आवाजात म्हणाले, आता आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही...

देवेंद्र फडणवीसांकडे १०५ आमदार असूनही दुसऱ्या पक्षातल्या माणसाला मुख्यमंत्रिपदी बसवून स्वत: त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करावं लागत आहे.भाजपाच्या(BJP) वॉशिंग मशिनमध्ये कोणतं डिटर्जंट वापरतात की, पक्षात येण्याआधी भ्रष्ट असलेला नेता भाजपामध्ये येताच अचानक पवित्र कसा होतो,अशी विचारणाही त्यांनी केली.

आजकाल देवेंद्र फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाण्याचे व्हिडिओ जास्त बघितले जातात.मला फडणवीसांची दया येते असा टोलाही कन्हैय्या कुमार यांनी या पत्रकार परिषदेत लगावला

"...यावर केंद्रीय गृहमंत्रालय काहीच बोलत नाही!"

कन्हैय्या यांनी राज्यात सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणावरुन केंद्रासह राज्य सरकारवर टीकेची झो़ड उठवली. ते म्हणाले, अमली पदार्थाचे अतिप्रचंड साठे अदानी यांच्या ताब्यात असलेल्या मुंद्रा बंदरातच कसे मिळतात, यावर केंद्रीय गृहमंत्रालय काहीच बोलत नाही असा हल्लाबोल त्यांनी केला.

कन्हैय्या कुमार( Kanhaiya Kumar) म्हणाले, तरुणाईच्या मेंदुला नियंत्रित करण्याचं काम ड्रग्ज करतात.ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणांना भोवतालचं भानच राहत नाही. त्यामुळे हे ड्रग्ज तरुणाईला खाईत लोटण्याचं काम करत आहेत. त्यांना घर, कुटुंब, समाज, देश याची कसलीच शुद्ध राहत नाही,असंही त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis News
NCP Political Crisis: अपात्र का करू नये ? विधिमंडळाच्या नोटिशीवर आमदार बाळासाहेब पाटलांची सूचक प्रतिक्रिया

...तरच देशात रोजगार निर्मिती होईल!

कन्हैय्या कुमार यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना देशातील आर्थिक रोजगारावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,देशात रोजगार निर्मिती वाढवायची असेल, तर देशाचं आर्थिक धोरण बदलण्याची गरज कन्हैय्या कुमार यांनी बोलून दाखवली.आज आपण चीनमधून आलेल्या गोष्टी वापरतो. पण आपल्याकडील उत्पादकता आपण मारली आहे. सेवा क्षेत्रासोबतच उत्पादनावर भर दिला, तरच देशात रोजगार निर्मिती होईल. त्यासाठी एककेंद्रीयता मोडावी लागेल असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

Devendra Fadnavis News
Lalit Patil Case Update : सचिन वाघला घेऊन पोलिसांची पुन्हा गिरणा नदी किनारी ड्रग्ज शोध मोहीम!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com