Naseem Khan News : 'झुंडशाहीच्या बळावर दंगली घडवण्याचे हे कारस्थान' ; विशाळगड प्रकरणी नसीम खान यांचा आरोप!

Naseem Khan Reaction On Vishalgad Violence : राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतच त्यांच्या विचारांना काळीमा फासण्याचा प्रयत्न, असल्याची केली टीका.
Naseem Khan
Naseem KhanSarkarnama
Published on
Updated on

Congress leader Naseem Khan and Vishalgad Encroachment : विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी माजी मंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे. शिवाय या प्रकरणावरून त्यांनी पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारवरही निशाणा साधला.

'महाराष्ट्रात झुंडशाहीच्या बळावर दंगली घडवण्याचे हे कारस्थान दिसत आहे. राज्यात यापूर्वीही सामाजिक शांतता बिघडावी यासाठी दोन जाती धर्मात दंगली घडवण्याचे प्रयत्न झाले आहेत, यातून काही बोध घेतल्याचे दिसत नाही. विशाळगडाखालील मजापूर गावातील या घटनेत ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नुकसान भरपाई द्यावी.', अशी मागणीही नसीम खान(Naseem Khan) यांनी केली आहे.

Naseem Khan
Abdul Sattar News : संभाजीराजे छत्रपती अन् इम्तियाज जलील यांना अब्दुल सत्तारांनी दिला 'हा' सल्ला!

विशाळगड दंगल प्रकरणी माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात आमदार भाई जगताप, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार युसुफ अब्राहनी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा, प्रवक्ते निजामुद्दीन राईन, भरत सिंह भरतसिंह होते.

यावेळी नसीम खान माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली मजापूर गावातील अल्पसंख्याक समाजाच्या घरावर हल्ले करून तोडफोड, जाळपोळ करून मारहाण करण्यात आली. अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तसेच विशाळगडावर मोर्चा काढणार याची पोलिसांना माहिती असतानाही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. कायदा हातात घेऊन दंगल करणाऱ्यांना मोकळीक दिल्याचे स्पष्ट दिसत आहे.'

Naseem Khan
Asaduddin Owaisi News : 'हा एकप्रकारे मशिदीवरील दहशतवादी हल्लाच' ; विशाळगड प्रकरणी ओवैसींची संतप्त प्रतिक्रिया!

तसेच, 'कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे, विशाळगडावरील घटनेने शाहू महाराजांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम काही लोकांनी केले आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली ४० ते ५० कुटुंबावर हल्ला करण्यात आला. या घटनेने राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेला आळा घालता आला असता पण तसे प्रयत्न केल्याचे दिसत नाही.' असही नसीम खान यांनी यावेळी बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com