Rahul Gandhi On Adani: राहुल गांधींचा अदानींवर हल्लाबोल; 1 बिलियन डॉलर्स दुसऱ्या देशात गेल्याचा केला गंभीर आरोप

Rahul Gandhi On PM Modi and Gautam Adani: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबईत 'इंडिया' आघाडीची बैठक पार पडत आहे. या बैठकीदरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

"पंतप्रधान मोदी यांच्या जवळच्या एका सहकाऱ्याने शेअर्ससाठी अब्जावधी डॉलर्सचा गैरव्यवहार केला. मग यामध्ये नेमकी कुणाचे पैसे आहेत. अदानी यांचे की अन्य कुणाचे ?, याची पंतप्रधान मोदींनी चौकशी केली पाहिजे", असा आरोप राहुल गांधींनी केला.

Rahul Gandhi
Rahul Gandhi's Mumbai Tour : मुंबईच्या ‘त्या’ दौऱ्यात काँग्रेसच्या तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांनी राहुल गांधींचे जोडे उचलले होते

याचवेळी काही जातगिक वृत्तपत्रांचा दाखला देत गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भात राहुल गांधींनी अनेक प्रश्नही उपस्थित केले. अदानी कुटुंबाने शेअरमध्ये पैसे गुंतवून मोठा गैरव्यवहार केला, तब्बल 1 बिलियन डॉलर्स अदानींच्या माध्यमातून दुसऱ्या देशात गेले आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.

Rahul Gandhi
Nashik MVA News : भाजप हटाव, देश बचाव 'इंडिया'च्या बैठकीला पाठिंबा ; नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा जल्लोष !

गौतम अदानी यांची एका प्रकरणात चौकशी झाली होती. त्यामध्ये त्यांना क्लिनचीट देण्यात आली. इतकच नाही अदानी यांची चौकशी करणाऱ्या संबधित अधिकाऱ्याला अदानींच्या कंपनीत नोकरी देण्यात आली. त्यामुळे त्यांची जी चौकशी झाली, ती संशयास्पद आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. मात्र, या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, पंतप्रधान या प्रकरणाची चौकशी का करत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com