Ritu Tawde black saree controversy : काळ्या साडीत महापौर तावडे; ठाकरेंच्या ‘शेरनी’चा सणसणीत पलटवार!

Congress protests alleged rejection of Nari Shakti Vandan Bill; Mumbai Mayor Ritu Tawde black saree appearance sparks sharp reaction from Shiv Sena UBT leader Kishori Pednekar : काँग्रेस अन् विरोधकांच्या निषेधासाठी महापौर रितू तावडे मुंबई महापालिकेच्या सभागृहात काळे साडी घालून पोहोचल्या होत्या.
Ritu Tawde black saree controversy
Ritu Tawde black saree controversySarkarnama
Published on
Updated on

Nari Shakti Vandan Bill Protest : लोकसभेत भाजप नरेंद्र मोदी सरकारचे 'नारीशक्ती वंदन' विधेयक नामंजूर झाले. काँग्रेस अन् विरोधकांनी एकजूट दाखवली. भाजपने आता देशभरात विरोधकांच्या निषेध सुरू केला आहे.

मुंबईत भाजप सत्ताधारी नगरसेवक या निषेधासाठी काळे कपडे घालून, महापालिकेच्या सभागृहात निषेध केला. भाजप महापौर रितू तावडे देखील काळी साडी परिधान करून दाखल झाल्या होत्या. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे विरोधी पक्षनेता किशोर पेडणेकर चांगलच सुनावलं.

लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे याकरीता केंद्र सरकारने आणलेले ‘नारीशक्ती वंदन’ हे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाले. याचे मुंबई (Mumbai) महापालिका सभागृहात पडसाद उमटले. सत्ताधारी भाजपचे सर्व नगरसेवक काळ्या कपड्यांमध्ये महापालिका मुख्यालयात आले होते.

ही घटनादुरुस्ती प्रतिष्ठेची करणाऱ्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारवर पराभवाची नामुष्की ओढावली. मुंबई महापालिकेच्या सभागृहातही या पराभवाचे पडसाद उमटले. मुंबई महापालिकेच्या सभागृहात सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चा होणार होती. मात्र सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभागृह नेते गणेश खणकर यांनी निषेधाचा ठराव मांडला. यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांची दोन्ही बाजूने घमासान भाषणे झाली.

Ritu Tawde black saree controversy
Devendra Fadnavis : '...तर मीसुद्धा बिनडोक ठरेन'; फडणवीसांचा टोला, नेमकं प्रकरण काय?

महापौरांची काळी साडी…

निषेधाच्या या ठरावासाठी भाजपचे सगळे नगरसेवक काळ्या रंगाचे कपडे घालून महापालिका मुख्यालयात आले होते. या वेळी महापौर रितू तावडे यांनीही काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. रितू तावडे यांच्या या काळ्या रंगाच्या साडीवरून विरोधक त्यांच्यावर तुटून पडले.

Ritu Tawde black saree controversy
Rahuri Bypoll Political Twist : मुख्यमंत्री आले, आभार मानले अन् निघून गेले; पण तनपुरेंचा ‘भगवा टायमिंग’ गेम कितपत यशस्वी? राजकारणात नवा ट्विस्ट!

पेडणेकर यांचा घणाघात

महापौरांच्या खुर्चीने कधी काळा रंग पाहिला नाही, तुम्ही तो दाखवला. महापौरांच्या मानाच्या खुर्चीवर बसून असा निषेध व्यक्त करणे योग्य नाही. आजवर कुणीही अशा प्रकारे खुर्चीवर बसून निषेध केला नव्हता, असा घणाघात विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com