ST Bus Ticket Price Hike : एसटी प्रवासी भाडेवाढीचा निर्णय महायुतीच्या अंगलट; पोरखेळ आहे का? काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी डिवचलं (पाहा VIDEO)

ST fare hike criticism by Vijay Wadettiwar : एसटी प्रवासी भाडेवाढीचा निर्णयावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : एसटी महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढ नेमकी कोणी केली, यावरून गोंधळ सुरू आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना या भाडेवाढीची सुरवातीला कल्पना नव्हती. आता भाडेवाढीवर प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

महायुती सरकारला हा निर्णय अंगलट येताना दिसतो आहे. हा निर्णय कोणी घेतला, यावरून महायुती सरकारच्या परिवहन विभागात गोंधळ सुरू असतानाच, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टायमिंग साधत, जोरदार टीका केली आहे.

काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या समाज माध्यमावर व्हिडिओ शेअर करत, एसटी बसच्या प्रवासी भाडेवाढीवर टीका केली. ते म्हणाले, "एसटीची प्रवासी भाडेवाढ परिवहन मंत्र्यांनी केली नाही, तर त्या खात्याला वाली कोण? निर्णय अंगलट आले की, अधिकाऱ्यांनी केले आणि काही चांगले झाले की श्रेय घेण्यासाठी पुढे करायचे, अशी महायुतीमधील मंत्र्यांच्या कामाची पद्धत सुरू झाली आहे".

Vijay Wadettiwar
BJP Politics : सदस्य नोंदणी अभियानाकडे भाजप आमदारांची पाठ; विजय चौधरी म्हणाले, 'हे नाही चालणार'

महायुती (Mahayuyti) सरकारने एसटी प्रवासी भाडेवाढीत तब्बल 14.97 टक्के वाढ केली. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही दरवाढ अधिकाऱ्यांनी केल्याचा दावा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाडेवाढीचा निर्णयावर फक्त चर्चा झाली होती, असे सांगितले होते. मंत्री नरहरी झिरवळ यांनी देखील ओझरता विषय झाल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय घेतल्याने मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णय क्षमतेवर टीका होऊ लागली होती. त्याचवेळी मंत्री सरनाईक यांनी भाडेवाढीचा घोषणा केली. पण हा निर्णय अंगलट येऊ लागल्याने महायुतीमध्ये निर्णयावरून गोंधळ दिसतो आहे.

Vijay Wadettiwar
Walmik Karad : वाल्मिक कराडच्या मर्जीतील 'ते' 26 पोलिस अधिकारी; तृप्ती देसाईंनी यादी जाहीर केली

विजय वडेट्टीवार यांनी एसटीची भाडेवाढ परिवहन मंत्र्यांनी केलेली नाही आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध असेल, तर ही प्रवासी भाडेवाढी तत्काळ मागे घ्यावी. परिवहन मंत्र्यांनी हा निर्णय घेतला नसेल आणि अधिकारी परस्पर निर्णय घेत असतील, तर परिवहन खात्याला वाली कोण? निर्णय अंगलट आल्यावर अधिकाऱ्यांवर ढकलायचा आणि चांगले झाल्यावर त्याचे श्रेय घ्यायचे, ही महायुतीच्या कामाची पद्धत आहे. महायुती सरकारने हा अधिकाऱ्यांचा पोरखेळ थांबवावा, आणि भाडेवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली.

एसटी महामंडळाला अध्यक्ष नाही. अध्यक्ष असेल, तर सरकारच्या परवानगीशिवाय करता येत नाही. एवढी मोठा भाडेवाढीचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतलेला नाही. मग महायुती सरकारमधील सर्व खाती अधिकारी चालवतात का, असे म्हणायचे का? मंत्री घरी बसून आदेश काढतात का? असा हा पोरखेळ असेल, तर तो तत्काळ थांबवा. सर्व काही गंमत-जमंत सुरू आहे. सरकारला गांभीर्य नाही. अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला असेल, तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार, मंत्री कारवाई करणार का? असे प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com