Walmik Karad : वाल्मिक कराडच्या मर्जीतील 'ते' 26 पोलिस अधिकारी; तृप्ती देसाईंनी यादी जाहीर केली

Trupti Desai reveals police officers list : वाल्मिक कराड याच्या मर्जीतील बीड पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी तृप्ती देसाईंनी समाज माध्यमांवर शेअर केली.
Walmik Karad | Trupti Desai
Walmik Karad | Trupti Desai Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलं तापलं आहे.

देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीका करण्यास सुरवात केली आहे.

आता तृप्ती देसाई यांनी बीड (BEED) येथे कार्यरत असलेल्या आणि वाल्मिक कराड यांच्या निकटवर्ती असल्याचा दावा करत पोलिस कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर या 26 पोलिस अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये हवालदारापासून एपीआय, डीवायएसपी, अतिरीक्त पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Walmik Karad | Trupti Desai
BJP Politics : सदस्य नोंदणी अभियानाकडे भाजप आमदारांची पाठ; विजय चौधरी म्हणाले, 'हे नाही चालणार'

या सर्वांची बदली बीड जिल्ह्याबाहेर करावी, अशी मागणी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे तृप्ती देसाई यांनी केली आहे. या सर्वांची बदली झाली, तरच गुन्हेगारीमुळे बीड जिल्ह्याची होत असलेली बदनामी थांबली जाईल, असेही तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

Walmik Karad | Trupti Desai
Congress Politics : काँग्रेसचे मराठा कार्ड की ओबीसीवर नेत्यावर मदार, प्रदेशाध्यक्ष निवडीला उशीर?

तृप्ती देसाई म्हणाल्या, "मी वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय, मर्जीतील बीडमधील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मी येथे शेअर करीत आहे. गृहमंत्र्यांनी आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सर्व खात्रीलायक चौकशी करून, त्यांची बदली बीड जिल्ह्याबाहेर करणे गरजेचे आहे. तरच आपण बीड जिल्ह्यातील गुंडाराज रोखू शकतो".

तृप्ती देसाई यांनी जाहीर केलेली यादी पुढीलप्रमाणे

पोलिस निरीक्षक प्रवीण बांगर (गेवराई), पोलिस उपअधीक्षक राजकुमार मुंडे (अंबाजोगाई), API बाळराजे दराडे (बीड ग्रामीण), API रंगनाथ जगताप (अंबाजोगाई ग्रामीण), API बन्सोड (केज), API दहिफळे (शिरसाळा), API घुगे (पिंपळनेर), स्थानिक गुन्हे शाखेतील भागवत शेलार(केज बीट), सचिन सानप (परळी बीट), राजाभाऊ ओताडे (बीड), अतिरीक्त पोलिस संजय राठोड (अंबाजोगाई), पोलिस कर्मचारी त्रिंबक चोपने (केज), सतीश कागने (अंबाजोगाई), बाबासाहेब बांगर (केज), विष्णू फड (परळी शहर), चालक अमोल गायकवाड (युसूफवडगाव), दिलीप गित्ते (केज), डापकर (केज), शेख जमीर (धारूर), चोवले (बर्दापुर), रवि केंद्रे (अंबाजोगाई), बापू राऊत (अंबाजोगाई), भास्कर केंद्रे(परळी), गोविंद भताने (परळी), विलास खरात (वडवणी), बाला डाकने (नेकनूर).

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com