निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अर्जावर सही न केल्यानं पद आलं धोक्यात‍!

मुंबई महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने उमेदवारी अर्जावर सही केली नव्हती.
Election
Election
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) २०१७ मधील सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने उमेदवारी अर्जावर सही न केल्याने नगरसेवकाचे (Corporator) पद तांत्रिक कारणामुळे धोक्यात आले आहे. भाजपचे (BJP) नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. लघुवाद न्यायालयाने निर्णय देताना निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा आणि त्या अनुषंगाने भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निकाल दिला आहे.

दरम्यान, या निर्णयाच्या अंमलबजावणीस लघुवाद न्यायालयाने ४ आठवड्यांची स्थगिती दिल्याने तूर्तास शिंदे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुलुंड विभागातील भार्गव कदम यांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यावर लघुवाद न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायालयाने निर्णय दिला. प्रभाग क्रमांक १०६ मुलुंड येथील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा आणि त्या अनुषंगाने भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय न्यायायाने दिला.

Election
अमित शहांची खेळी : निवडणुकीआधीच काँग्रेसच्या अर्ध्या राज्यावर मिळवला ताबा

या निर्णयाविरुद्ध लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन न्याय मागणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो, परंतु या एकूणच प्रकरणात माझी काहीच चूक नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझ्या उमेदवारी अर्जावर सही केलेली नव्हती. त्यानंतर उमेदवारी यादी प्रसिद्ध झाली होती. अखेर मी निवडणूकही जिंकलो आणि माझे नावही गॅझेटमध्ये प्रसिद्ध होऊन मला प्रमाणपत्रही दिले गेले. असे असताना एका तांत्रिक चुकीमुळे हे सर्व प्रकरण घडले, असे शिंदे यांनी सांगितले.

Election
माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांच्या प्रकृतीबाबत 'एम्स'चा अखेर खुलासा

मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी सोबत लढणार असल्याचे दावे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केले जात आहे; मात्र काँग्रेसच्या मुंबईतील नेतृत्वाने ही निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक सोबत लढण्याची शक्‍यता आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्यामुळे आता महापालिकेच्या निवडणुका सोबत लढण्याचा विचार या पक्षांकडून केला जात आहे. महापालिकेची आगामी निवडणुक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. शिवसेनेने यासाठी बैठका सुरु केल्या आहेत. भाजपनेही आता महापालिकेत आक्रमक भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसनेही मुंबईतील अनेक मुद्दे लावून धरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढण्याची जास्त शक्‍यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com