Jitendra Awhad : आव्हाडांना कोर्टाचा मोठा दिलासा; मुंब्रा पोलिसांना दिले 'हे' निर्देश

Jitendra Awhad : ऋता आव्हाड यांनी मुंब्रा पोलिसांना पत्र लिहिलं आहे.
Jitendra Awhad Latest News
Jitendra Awhad Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणात त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आव्हाड यांना उद्या, मंगळवारी (ता.15 नोव्हेंबर) सकाळी ११ वाजेपर्यंत अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत अटकेची कारवाई करू नये, असे कोर्टाने मुंब्रा पोलिसांना निर्देश दिले असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी दिली आहे. (Jitendra AwhadLatest Marathi News)

Jitendra Awhad Latest News
खर्गेंनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली अन् पृथ्वीराजबाबांना दिली मोठी जबाबदारी...

ऋता आव्हाड यांनी मुंब्रा पोलिसांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात म्हणाल्या की, 'तक्रारदार महिला पोलीस संरक्षण मिळावे म्हणून आरोप करू शकते. आव्हाडांच्या नावाने तक्रारदार महिलेला धमकीचा फोन जाऊन खोटी तक्रा होऊ शकते. त्यासाठी यांच्या नावाने तक्रारदार महिलेचा धमकीचा फोन जाऊ शकतो. त्यासाठी अशी कुठलीही तक्रार पोलीस ठाण्याला तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र ऋता आव्हाड यांनी मुंब्रा पोलिसांना दिले.

Jitendra Awhad Latest News
जितेंद्र आव्हाडांसाठी अजितदादा मैदानात; ट्वीट मागे घेणार...

दरम्यान, आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपावला आहे. या राजीनाम्यावर ऋता आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ऋता आव्हाड म्हणाल्या की, राजीनाम्याच्या निर्णय जनतेनी ठरवला पाहिजे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे तीन वेळा आमदार राहिले असून आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात जनतेने घातली आहे. ते निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा त्यांनी माझी परवानगी घेतली नव्हती. मात्र आता असं वाटतंय की, देशात जे काही सुरू आहे, ते थांबायला हवं, अशा शब्दात त्यांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com