MP Shrikanat Shinde News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी, दौरे वाढले आहेत.पण काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार आणि कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.या भेटीवरुन विरोधकांनी अजितदादांसह सरकारवर टीकेची झोड उठवली.अजितदादांनीही या भेटीवरुन पार्थ पवार यांचे कान टोचले.
या भेटीची चर्चा ताजी असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात जामिनावर सुटलेला कुख्यात गुंड हेमंत दाभेकर हा दिसून आला अन् उलटसुलट चर्चांना उधाण आले.खासदार श्रीकांत शिंदे यांनी या फोटोची तत्काळ दखल घेत संबंधित युवासेनेच्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टीही केली. मात्र, आता हा फोटो व्हायरल करुन खासदार शिंदेंना धक्का देणारा तो युवासेनेचा पदाधिकारी कोण याबाबतची चर्चा जोर धरू लागली आहे.
कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपतराव गायकवाडांनी केलेल्या गोळीबारामुळे एकीकडे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.यातच आता खासदार श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील एका फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट भेटली.आणि विरोधकांनी ही टीकेची संधी न दवडता पुन्हा एकदा सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला. त्यात खासदार संजय राऊत यांनी तर कहर म्हणजे ट्विटरवर फोटो शेअर करत 'गुंडाराज' अशीच तोफ डागली.
कल्याणमधील गोळीबाराच्या घटनेने आधीच तणावात असलेल्या खासदार श्रीकांत शिंदेंचे त्यांच्याच पक्षातील विशेष करून युवा सेनेच्याच अनिकेत जावळकरांनी ‘टेन्शन’ वाढवले.डॉ.श्रीकांत यांच्या ‘बर्थ डे’ सेलिब्रेशनसाठी कुख्यात हेमंत दाभेकर (Hemant Dabhekar) नेऊन ‘ताकद’ दाखविण्याच्या नादात अनिकेतला थेट पदच गमवावे लागले.डॉ.श्रीकांत यांच्यासमवेत अनिकेत आणि दाभेकरचा फोटो व्हायरला होताच सोशल मीडियात खळबळ उडाली.दाभेकरच्या ‘हजेरी’वरून अनिकेतला ‘शिक्षा’ ठोठावण्याचा पवित्रा युवा सेनेच्या नेतृत्वाने घेतला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
डॉ. श्रीकांत यांनी फोटोवरून राजकारण तापण्याची शक्यता गृहीत धरत एका झटक्यातच अनिकेतला युवा सेनेच्या पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला.अनिकेतला युवा सेनेतील पश्चिम महाराष्ट्राचे निरीक्षक पदावर पाणी सोडावे लागले. राजकारणात बारकावे जाणून असलेल्या डॉ.श्रीकांत यांनी कार्यकर्त्यांचे लाड खूपवून न घेण्याचा ‘मेसेज’ युवा सेनेत धाडला.
हेमंत दाभेकर याला वर्षा निवासस्थानी अनिकेत जावळकर (Aniket Jawalkar) याने नेले होते.यामुळे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी त्याच्यावर कारवाई केली.त्यांची पश्चिम महाराष्ट्र निरीक्षकपदावरुन हकालपट्टी केली.त्याच्या पदाधिकाऱ्याच्या हकालपट्टीचे पत्र काढण्यात आले.हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली होती.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.