Dharashiv Loksabha Constituency : धाराशिव लोकसभेच्या उमेदवारीचा घोळ मिटेना ; शिंदे - पवार गटात रस्सीखेच...

claims of all the three parties in Mahayuti : महायुतीतील तीनही पक्षांची दावेदारी ; वरिष्ठ नेते काय मार्ग काढतात हे लवकरच स्पष्ट होईल.
Omraje Nimbalkar, Suresh Birajdar, Dhananjay Sawant
Omraje Nimbalkar, Suresh Birajdar, Dhananjay SawantSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव लोकसभा मतदारसंघ महायुतीतील कोणता पक्ष लढवणार ? हे अद्याप गुलदसत्यात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच शिवसंकल्प दौरा केल्यामुळे ही जागा शिवसेना लढवणार, अशी चर्चा होती. परंतु शिंदे यांनी याबाबत कुठलेही संकेत किंवा भाष्य आपल्या भाषणातून केले नाही. त्यामुळे शिवसैनिकांचा हिरमोड झाला, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला अजूनही धाराशिवच्या जागेबद्दल आशा आहे.

खरतर धाराशिवच्या जागेवर पूर्वीपासून महायुतीतील तीनही पक्षांनी दावेदारी सांगितली होती. परंतु गेल्या काही दिवसापासून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडून जागेवर दावेदारी सांगितली जात आहे. या मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेनेचा खासदार निवडून आल्यामुळे शिंदेचा दावा प्रबळ समजला जातो. तर अजित पवारांनी जिल्ह्यात आमची ताकद जास्त आहे, असे म्हणत जागा देण्याची मागणी लावून धरली आहे.

Omraje Nimbalkar, Suresh Birajdar, Dhananjay Sawant
Satara News: एका चिठ्ठीनं राखली सत्ता; शरद पवार गटाचा शिंदे गटाला धक्का

आता यावर महायुतीचे वरिष्ठ नेते काय मार्ग काढतात हे लवकरच स्पष्ट होईल. पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी पुतणे धनंजय सावंत यांच्यासाठी लाॅबिंग सुरू केल्याचे बोलले जाते. सावंतांच्या कुटुंबातून धाराशिवचा खासदार व्हावा, असे प्रयत्न पाहून महायुतीमधील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनीही खासदारकीसाठी दंड थोपटले आहेत. तर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी संदर्भात अजूनही मौन बाळगले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीकडून ओम राजेनिंबाळकर यांचे नाव निश्चित समजले जाते. शिंदे - पवार गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असल्याने दोघांपैकी धाराशिवची जागा कोण लढणार याचा निर्णय राज्यातील नेत्यांना लवकर घ्यावा लागणार आहे. पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचे जिल्हाभरात भावी खासदार म्हणून ब्रॅडिंग सुरू आहे.

विशेष म्हणजे त्याला काका तानाजी सावंत यांचीही हरकत दिसत नाही, कारण त्यांनी यावर कुठलेच भाष्य केलेले नाही. उलट पुतण्याला बळ देण्यासाठीच तेरणा कारखान्यावर शिवसेनेचा 'मिशन 48' शिवसंकल्प मेळावा घेऊन वातावरण निर्मिती केल्याची चर्चा आहे. तिकडे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव लोकसभा निवडणूक लढविण्यास आपण योग्य उमेदवार असल्याचे सांगितल्याचा दावा केला आहे.

त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी पत्रकार परिषद घेवून बिराजदार हे राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याचे जाहीर करून टाकले. बिराजदार यांनीही मतदारसंघामध्ये विविध गावात गाठीभेटी व उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. एवढेच नाही, तर खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पैलवान तयार आहे, असे म्हणत आव्हानही दिले आहे.

भारतीय जनता पार्टीचे माजी विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यात छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय जनता पार्टीचे बसवराज मंगरूळे यांनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला लोकसभेचा मंत्र दिल्याचे सांगून मतदारसंघात चर्चा घडवून आणली आहे.

(Edited by Amol Sutar)

Omraje Nimbalkar, Suresh Birajdar, Dhananjay Sawant
Soniya Gandhi : सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? 'या' राज्यातून राज्यसभेवर जाण्याची शक्यता

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com