Eknath Shinde : शिवसेनेच्या चुरगळलेल्या झेंड्यांचा अर्थ काय? मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात अशीही 'झेंडे'बाजी

Shivsena Flag in Thane : शिवसेनेच्या झेंडेबाजीत ठाणे महापालिकेसमोरील 'कॉमन मॅन'ही झाकोळला आहे. महापालिका आयुक्त याविरोधात कारवाई करणार का?
Eknath Shinde, Shivsena flag
Eknath Shinde, Shivsena flagSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या (9 फेब्रुवारी) 60 वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने ठाण्यतील चौकाचौकात मोठ्या प्रमाणात त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर आणि शिवसेनेचे झेंडे झळकताना दिसत आहे. यामुळे शहर विद्रुपीकरणात भर पडली. त्यातच महापालिका मुख्यालयाजवळील सर्कलवर लावण्यात आलेल्या चुरगळलेले झेंड्यांची चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेच्या (Shivsena) चुरगळलेल्या या झेंड्यांमुळे तेथे असलेला 'कॉमन मॅन'चा पुतळाही झाकून गेला आहे. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) दिवसभर ठाण्यात असून त्यांच्या प्रती असलेली भावना व्यक्त करताना बॅनर किंवा झेंडे लावले आहेत. ते व्यवस्थित आहेत की नाही हे न पाहता, ते लावून मोकळे होणे यातच धन्यता मानली गेल्याची दिसत आहे.

Eknath Shinde, Shivsena flag
Eknath Shinde : महायुतीच्या ठाण्यातील उमेदवाराची आज घोषणा? शिंदेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बड्या नेत्यांची मांदियाळी

विद्रुपीकरणाविरोधात कारवाई करणार?

ठाणे शहर विद्रूपीकरण केल्यास दंड आकारण्याबरोबर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले होते. याशिवाय दर बुधवारी फलक हटाव मोहीम हाती घेतली जाईल, असे म्हटले होते. आता थेट ठाणे महापालिका (Thane Municipal Corportation) मुख्यालयासमोर बॅनरबाजीला अक्षरशः उत आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही कारवाई टाळून आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र ठाण्यात पाहण्यास मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे शहरातील विविध कामांचे लोकार्पण होणार आहे. शिवाय महायुतीचे सर्व महत्त्वाचे नेते ठाण्यात येणार असल्याने शहरासह महापालिका मुख्यालयाजवळच शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवाय झेंडेही लावण्यात आले आहे. हे झेंडे लावताना, ते झेंडे व्यवस्थित आहेत की नाही ते पाहण्याची काळजी घेतली नसल्याचे दिसते. त्यामुळे या चुरगळलेले झेंड्यांबाबत (Crumpled flags of Shivsena) शिवसेनेचे पदाधिकारी काय निर्णय घेतात, हे पाहावे लागणार आहे. ते झेंडे तसेच ठेवून पक्षामध्ये चुरगळलेल्या झेंड्यासारखी मरगळ मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात येऊ पाहत नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

(Edited by Avinash Chandane)

Eknath Shinde, Shivsena flag
Jitendra Awhad News : 'तुम्ही हातातलं घड्याळ चोरलं, पण मनगट आमच्याकडेच' ; आव्हाडांकडून अजित पवार लक्ष्य!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com