Dasara Melava
Dasara Melava Sarkarnama

Flashback Dasara Melava : शिवतीर्थावरची तोफ अन् 'बीकेसी'तून बाण...

Shiv Sena Dasara Melava 2022 : काय झालं होतं 2022 च्या दसरा मेळाव्यामध्ये.
Published on

Mumbai News : मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली खेचूनही समाधान न झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या हातातला धनुष्यबाणही हिसकावला. काही केल्या धनुष्यबाणा न सोडण्यावर ठाम राहिलेल्या ठाकरेंनी कोर्टाच्याही पायऱ्या चढल्या; पण शिंदेंनी बाजी मारली आणि शिवसेना, धनुष्यबाणावर आपली पकड मजबूत केली. ठाकरेंकडचे सारे काही आपल्याकडे घेतल्यानंतर शिंदेंनी गेल्या वर्षी पहिलावहिला दसरा मेळावाही भरवला.

दुसरीकडे, परंपरेनुसार ठाकरेंनी शिवतीर्थावर शिवसैनिकांना एकत्र आले. हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने ठाकरेंनी जहरी शब्दांत शिंदेंना शब्दश: फोडून काढले. त्यानंतरच्या काही मिनिटांतच खचाखच भरलेल्या 'बीकेसी’तील सभेचा ताबा घेत, ठाकरेंना बघून घेण्याची भाषा केली. या मेळाव्याने ठाकरे - शिंदेंमधील संघर्षाला धार चढली. गेल्या दसरा मेळाव्यांतून कोणी कसा बाण सोडला आणि तो कोणी चुकवला, याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधणारा 'सरकारनामा' हा खास रिपोर्ट...

Dasara Melava
Dasara Melava Sarkarnama
Dasara Melava
Dasara Melava Sarkarnama
Dasara Melava
Dasara Melava Sarkarnama
Dasara Melava
Dasara Melava Sarkarnama
Dasara Melava
Dasara Melava Sarkarnama
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com