Eknath Shinde Dasara Melava 2023 : मंगेश चिवटेंचे राजकीय ‘लाँचिंंग’ शिंदे सेनेतील बड्या नेत्यांच्या पचनी पडेल?

Mangesh Chivte Political Launching : चिवटेंनी आझाद मैदानावरच्या सभेतून थेट राज्य पातळीवरच आपले ‘ब्रॅंडिंग' करून टाकल्याचे दिसत आहे.
Mangesh Chivte-Eknath Shinde
Mangesh Chivte-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ठाकरे-शिंदेंच्या दसरा मेळाव्यांकडे साऱ्या राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. ठाकरेंकडून शिंदे आणि त्यांच्या मंत्री- आमदारांवर कोण बोलणार? शिंदेंच्या सभेतून ठाकरेंवर कोण कसे बाण सोडणार? हे पुढच्या काही मिनिटांत दिसेल, पण या सभांना रंग येण्याआधी आझाद मैदानातील सभेत शिंदेंचे ‘ओएसडी' आणि मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेंनी भाषण ठोकले. (Eknath Shinde Dasara Melava 2023 : Mangesh Chivte's speech at Eknath Shinde's Dasara Melava)

शिंदेंकडे नऊ-दहा मंत्री, ३० आमदार, आणि डझनभर खासदार असूनही सभेच्या ‘ओपनिंग’साठी चिवटे आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुळात, मुख्यमंत्र्यांच्या ‘ओएसडी’ने सभेत बोलावे. त्याला काही हरकत नसेल; पण शिंदेंकडे दिग्गज नेते असताना चिवटेंना का बोलावे लागले, असा प्रश्नही विचारला जाऊ शकतात. शिंदे सरकारमध्ये आपले प्रस्थ वाढविणारे चिवटेंनी आपले राजकीय ‘लाँचिंग’ करून घेतले असावे, असे बोलले जात आहे. शिंदेंच्या काही नेत्यांना हे पटणार की नाही, हे पुढच्या दोन-चार दिवसांत उघड होईल. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mangesh Chivte-Eknath Shinde
Maharashtra Sugar Factories Finance : कल्याणराव काळे, भरणे, पंडित, साठेंना ‘बूस्टर डोस’; कारखान्यांच्या मदतीत अजितदादांचा वरचष्मा

ठाकरे सरकारमध्ये चिवटे हे शिंदेंकडे महत्त्वाच्या जबाबदारीवर होते. ठाकरे सरकार पाडून शिंदे मुख्यमंत्री होताच काही दिवसांतच चिवटेंचे ‘प्रमोशन’ झाले आणि ते एका झटक्यात ‘ओएसडी’ झाले. त्यातून त्यांच्याकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखपदाची जबाबदारी आली. ती ते नेटाने पार पाडत आहेत, यात शंका नाही. आपल्याकडच्या यंत्रणेंचा पुरेपूर उपयोग करून घेत, चिवटे हे गरजूंच्या मदतीला धावून जात आहेत, त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहे.

सत्तेच्या वर्तुळात राहिलेले चिवटे हे राजकारणात उतरविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. तसे चिवटे हे महत्त्वाकांक्षी आहेत. त्यातून मंगेश चिवटे हे सोलापूर जिल्ह्यातून आमदारकीसाठी नशीब अजमावू शकतात, याचीही चर्चा आहे. त्यासाठीचे वातावरण तयार करण्यासाठी चिवटेंच्या घरातच शिंदेंनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बहाल केले. त्यातून चिवटे हे आपला राजकीय विस्तार करू पाहत असल्याकडे काहीजण लक्ष वेधतात. या साऱ्यांतूनच चिवटेंनी आझाद मैदानावरच्या सभेतून थेट राज्य पातळीवरच आपले ‘ब्रॅंडिंग' करून टाकल्याचे दिसत आहे.

Mangesh Chivte-Eknath Shinde
Pankaja Munde Bhagwangad Dasara Melava : ‘काही लोक म्हणतात पंकजा मुंडे पक्ष बदलणार; पण माझी निष्ठा एवढी लेचीपेची नाही’

अलीकडच्या काळात सर्वच राजकीय पक्षांत गटबाजी वाढत असल्याचे दिसत आहे, त्यात शिंदेंची शिवसेनाही मागे राहिलेली नाही. त्यामुळे चिवटेंनी केलेले स्वत:चे 'ब्रॅंडिंग' फसणार की उजळणार? हे लवकरच कळू शकते. विशेष म्हणजे, याआधी काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे 'ओएसडी' चिवटेंच्या डोळ्यांदेखतच आमदार झाल्याचा इतिहास आहे.

Mangesh Chivte-Eknath Shinde
Pankaja Munde Dasara Melava Speech : पंकजा मुंडेंनी परळीसाठी पुन्हा रणशिंग फुंकले; ही सीट लढा, ती सीट लढा, असं चालणार नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com