Dawood Ibrahim : दाऊदची भीती राहिली नाही, दोन कोटीला विकत घेतली जमीन

Mumbai : शिवसैनिकाने बोली लावत विकत घेतली मालमत्ता
Dawood Ibrahim
Dawood IbrahimSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मुंबई साखळी बाॅम्बस्फोटातील आरोपी, दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या विषयी कधीकाळी नागरिकांच्या मनात भीती होती. मात्र, ती आता राहिली नसल्याचे दिसून येते. दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या दोन मालमत्तांचा लिलाव मुंबईत करण्यात आला. या लिलावात दोन कोटी रुपयांची बोलू लावत एका वकिलाने या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या मालमत्तांची मूळ किंमत १५ हजार रुपये ठेवण्यात आली होती.

Dawood Ibrahim
Bjp News : ...म्हणून आता भाजपच्या खासदारांनाच नकोय पुन्हा लोकसभेचे तिकीट !

दाऊदचा प्लॅट खरेदी करणारे अजय श्रीवास्तव हे वकील आहेत. दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मुंबके या गावात शेतजमीन आणि घर अशा मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. जमिनीसाठी दोन कोटी रुपयांची बोली लागली. तर, दुसऱ्या मालमत्तेसाठी तीन लाख २६ हजाराची बोली लागली. दोन कोटीला विकल्या गेलेल्या मालमत्तेची मूळ किंमत 15 हजार 440 रुपये ठेवण्यात आली होती. अर्थखात्याच्या एका विभागाकडून या मालमत्तांचा लिलाव ठेवण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील मुंबके गावात असलेल्या चार शेतजमिनींचा लिलाव करण्यात आला. मात्र, मोठ्या शेतजमीनींसाठी बोली लागली नाही. वकील भूपेंद्र भारद्वाज हे या लिलावात सहभाग होत दोन कोटींची बोलू लावून शेतजमीन विकत घेतली.

श्रीवास्तव शिवसैनिक

दाऊदची मालमत्ता विकत घेणारे अजय श्रीवास्तव हे शिवसैनिक आहेत. यापुर्वी देखील त्यांनी दाऊदची मुंबईतील मालमत्ता विकत घेतली होती. लिलाव झालेल्या मालमत्तेचा सर्व्हे नंबर आपल्यासाठी शुभ असल्याचे गुरुजींनी सांगितले होते. त्यामुळे आपण ती विकत घेतल्याचे श्रीवास्तव यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com