Eknath Shinde Shivsena: मिशन मुंबई..! शिंदेंच्या शिवसेनेचा 'मास्टर प्लॅन' ठरला?

Shivsena Political News : शिवसेनेच्या मुंबईत शाखाप्रमुखासह सर्वच पदं रिक्त करून तिथं नव्यानं नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे पुढील काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीला मुंबईत नाविन्य आणि उत्साहासह सामोरे जाता येणार असल्याची माहितीही रामदास कदम यांनी यावेळी दिली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील बंडाला आता जवळपास पावणेतीन वर्षे उलटली आहे. या काळात त्यांना शिवसेना पक्ष,धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. एकीकडे मुख्यमंत्रीपदासाठी अडीच वर्षांचा कालावधी मिळालेल्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दिवसरात्र कामाचा झपाटा दाखवून जनतेच्या मनातला CM ही ओळख मिळवली.

त्याचसोबत त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 81 पैकी तब्बल 57 जागा जिंकल्या. यामुळे त्यांचा महायुतीसह राज्याच्या राजकारणातला दबदबा कायम असल्याचा राहिला. अशातच आता शिंदेंच्या शिवसेनेत फेरबदलाचे वारे वाहणार आहे.

शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी(ता.13) मुंबईच्या रंगशारदा सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी मोठे निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष महापालिकांसह स्थानिक स्वराज्य निवडणुकांकडे लागले आहे.

सर्वोच्च न्यायालय लवकरच याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देण्याची शक्यता असून त्यानंतर लवकरच या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची चिन्हे आहेत. त्याच धर्तीवर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं (Shivsena) मोर्चेबांधणीसह संघटनात्मक बदलाचे संकेत दिले आहेत.

Eknath Shinde
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पक्ष, चिन्ह गेल्यानंतर आता 'या' पदावरून हकालपट्टी?

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित पार पडलेल्या या मेळाव्यात अनेक महत्वाचे ठरावही करण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्व प्राप्त झाले होते. आजपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्तापर्यंत आपल्या शिवसेनेची ताकद वाढवण्यावर सतत भर दिला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षासह इतर बड्या नेतेमंडळी,पदाधिकारी,कार्यकर्त्यांचं इनकमिंग करुन आपल्या पक्षाची ताकद वाढवली आहे. एकनाथ शिंदे मुंबईसह राज्यभरात मोठे खांदेपालट करणार आहे.

शिवसेनेच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त होणार आहे.पालिका निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहे. याबाबत शिवसेनेचे फायरब्रँड नेते रामदास कदम म्हणाले,येत्या 23 तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या बीकेसीमध्ये भव्य मेळावा पार पडणार आहे. मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्यात शिवसेनेच्या सर्व आमदार आणि खासदारांचा भव्य सत्कार केला जाणार असल्याचं कदम यांनी यावेळी सांगितलं.

Eknath Shinde
Goa MLA News : मुख्यमंत्री सावंतांसोबत दिल्ली गाठलेल्या आमदारांपैकी एकाने मंत्रिपदाबाबत सोडल मौन अन् म्हटलं...

शिवसेनेच्या मुंबईत शाखाप्रमुखासह सर्वच पदं रिक्त करून तिथं नव्यानं नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे पुढील काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीला मुंबईत नाविन्य आणि उत्साहासह सामोरे जाता येणार असल्याची माहितीही रामदास कदम यांनी यावेळी दिली आहे.

मुलाखतीसह केलेल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर समिती नियुक्ती करणार आहे. गिरगाव,दादर यांसारख्या समित्या गठीत केल्या जाणार आहे. समितीला योग्य वाटलेलं एकनाथ शिंदे यांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर शिंदे नियुक्तीबाबत निर्णय घेतील, असं या बैठकीत ठरल्याचंही कदम यांनी सांगितलं.

Eknath Shinde
Goa MLA News : मुख्यमंत्री सावंतांसोबत दिल्ली गाठलेल्या आमदारांपैकी एकाने मंत्रिपदाबाबत सोडल मौन अन् म्हटलं...

या बैठकीत आणखी एक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा ठराव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करावी, असा ठराव शिवसेनेच्या या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा ठराव घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची विनंती करण्यात येणार आहे. शिवसेनेचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com