'मुख्यमंत्री ठाकरेंनी शेवट गोड करावा,आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट बघतोय'

Deepak Kesarkar|Uddhav Thackeray : आम्हाला गुवाहाटीला थांबायला सुद्धा मर्यादा आहेत.
deepak kesarkar, Uddhav Thackeray Latest News
deepak kesarkar, Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Deepak Kesarkar : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सहयोगी पक्षाकडून सुरू आहे, त्याला कंटाळून आम्ही गुवाहाटी येथे गेलो आहे. आजही वेळ गेली नाही आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपसोबत चर्चा करावी आणि शेवट गोड करावा, असे आवाहन बंडखोर गटाचे आमदार दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले आहे. त्यांनी आज एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. (deepak kesarkar, Uddhav Thackeray Latest News)

deepak kesarkar, Uddhav Thackeray Latest News
उद्धव ठाकरेंच्या भोवतीचे बडवे कोण; बंडखोरांचा या नेत्यांवर निशाणा

केसरकर म्हणाले, की, राऊतांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध हे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत बिघडत आहे. पंतप्रधान हे उद्धव ठाकरे यांना छोटा भाऊ मानतात. शरद पवारांनी तीन वेळा शिवसेना फोडली आहे. महाविकास आघाडी झाल्यावर पवार साहेंबाकडून खुप अपेक्षा होत्या. मात्र त्यांचे प्रदेशाध्यक्ष शिवसेनेचा आमदार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवाराला ताकत देत होते. शिवसेनेला संपवल्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आणि गुवाहाटीला गेलो. त्यांची सत्ता जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पणाला लावण्यात येत आहे, असा आरोप केसरकरांनी राष्ट्रवादीवर केला.

आम्ही भाजपमध्ये विलिन होणार असं म्हटलं जातं होत मात्र, यामध्ये तथ्य नाही. आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये जर चर्चा झाली असेल तर याकडे मी सकारात्मकतेने बघतो. मी 50 आमदारांच्या भावना बोलत आहे. पंतप्रधान सध्या जर्मनीमध्ये असल्याने ठाकरे यांनी राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी आणि राज्याच्या हितासाठी तडजोड करावी. आम्हाला गुवाहाटीला थांबायला सुद्धा मर्यादा आहेत. ठाकरे हे शेवट गोड करू शकतात. त्यांनी आजही याबाबत विचार करावा त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत, असे आवाहन केसरकरांनी ठाकरेंना केले.

deepak kesarkar, Uddhav Thackeray Latest News
आम्हाला कोंढलं नाय...मारलं नाय...हाणलं नाय : शहाजीबापूंची पुन्हा डायलॉग बाजी!

दरम्यान, राऊतांच्या वक्तव्यावर आमदारांमध्ये राग आहे. आम्ही जे निवडून आलो ते भाजप-शिवसेनेच्या युतीचे म्हणून निवडून आलो आहेत. राऊत यांच्यासारखे प्रवक्ते कोणत्याही पक्षाला मिळू नये, असेही केसरकर म्हणाले. तसेच, एकनाथ शिंदे यांना राऊत रिक्षावाला म्हणतात, पण त्याच रिक्षावाल्याने शिवसेनेचा एक विभाग सांभाळला, ठाण्यातील सत्ता शिवसेनेला मिळवून दिली आहे. आमच्या मतावर निवडून आलेल्या संजय राऊतांनीच आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा,अशी मागणीही केसरकरांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com