Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा सामंतांना आधी जाब, नंतर पाठबळ... म्हणाले, 'किती फोन केले...'

Kiran Samant : भाजपाने जागेवर दावा केल्यानंतरही किरण सामंत यांचे भावी खासदार म्हणून बॅनर
Eknath Shinde Kiran Samant
Eknath Shinde Kiran SamantSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Political News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. याच जागेवर भाजपाने दावा सांगत मंत्री रवींद्र चव्हाण यांना तयारी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना पाठबळ दिल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री राजापूर तालुक्यात आले असता किरण सामंत यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी किरण सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत 'अरे किरण काल मी तुला किती वेळा फोन केले, उचलले नाहीत,' अशी विचारणादेखील किरण सामंत यांच्याकडे केली.

Eknath Shinde Kiran Samant
Kapil Patil Politics : निवडणूक तोंडावर आली अन् कपिल पाटील...

भावी खासदार म्हणून उल्लेख

रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू होताच व्हाॅट्सअपवर स्टेट्स ठेवून किरण सामंत यांनी इशारा दिला होता, की ते लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र, नंतर सारवासारव करताना महायुती जो उमेदवार देईल त्याचा आपण मनापासून प्रचार करू.

रवींद्र चव्हाण हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, असे किरण सामंत म्हणाले होते. मात्र, किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. या बॅनरमध्ये त्यांचा उल्लेख भावी खासदार म्हणून करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

किरण सामंत यांना उमेदवारी?

शिंदे गटातील नेते किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी, म्हणून आग्रही आहेत. खुद्द मंत्री उदय सामंत यांनी आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलल्याचे सांगितले होते. त्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनीदेखील किरण सामंत हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे स्पष्ट केले होते. भाजपाने या जागेवर दावा केला असला तरी शिंदे गटातील मंत्री मात्र किरण सामंत हेच उमेदवार असतील, असे ठासून सांगत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com