India Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (दि.१ फेब्रुवारी) संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला आहे. मंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले,''अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृत कालातील सर्वजन हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सर्व क्षेत्रातील लोकांचा विचार करण्यात आलेला आहे'', असं ते म्हणाले आहेत.
''येणाऱ्या २५ वर्षांमध्ये जो विकास भारताचा आपण पाहत आहोत, त्याकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पामधून स्पष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे याला ग्रोथ बजेट म्हणता येईल. तसेच ग्रीन बजेट म्हणता येईल. या अर्थसंकल्पाला पायाभूत सविधांचे बजेटही म्हणता येईल. मध्यमवर्गीयांचे बजेटही म्हणता येईल. यामुळे सर्व प्रकारच्या लोकांना या अर्थसंकल्पाच्या माध्यामातून दिलासा मिळणार आहे'', असंही ते म्हणाले.
''1 कोटी शेतकऱ्यांना नॅचरल शेतीकडे वळवले जात आहे. पहिल्यादा डिजिटल आणि टेक्नॉलॉजीचा वापर कसा आणता येईल, याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही प्राथमिक कृषी पथसंस्था आहेत. त्यांना मल्टीपरपस सोसायटीची मदत होणार आहे. तसेच दहा लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक ही देशात रोजगार निर्मिती करणारी आहे'', असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
''पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून 10 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. ही मोठी गोष्ट आहे. राज्यांना देखील पायभूत सुविधांची गुंतवणूक वाढवण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.
या बरोबरच महत्वाचं म्हणजे आजच्या बजेटमध्ये निर्णय झाला की, साखर कारखान्यांना जुना इन्कम टॅक्स लागणार नाही. राज्यातील साखर कारखान्यांना आता जुना टॅक्स भरावा लागणार नाही, त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांना दिलासा मिळणार आहे'', असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.