Prithviraj Chavan: अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर? पृथ्वीराज चव्हाणांनी फडणवीसांनाच बोलते केले

Political News: उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर भाजपने दिल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला
Prithviraj Chavan and Devendra Fadnavis
Prithviraj Chavan and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्याचे मुख्यमंत्री बदलण्याचा मुद्दा भलत्याच वळणावर नेऊन काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी ऐन अधिवेशनात गोंधळ उडवला. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्यास तयार नसल्याने भाजपने आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा दावा चव्हाणांनी ठोकला.

"लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी अजितदादांना मुख्यमंत्री केले जाईल, हेही चव्हाणांनी तेवढ्याच विश्वासाने सांगितले. चव्हाणांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात प्रंचड खळबळ उडाली. एकीकडे फडणवीस माध्यमांपुढे आले आणि शिंदेंच मुख्यमंत्री असतील, असे सांगून गेले.

दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणाऱ्या नेत्यांना अजितदादांनी सुनावले. काहीही असो अजित पवार मुख्यमंत्री होणार हा चव्हाणांचा दावा सत्ताधाऱ्यांच्या फार जिव्हारी लागल्याचे घटनाक्रमांवरून दिसते आहे.

Prithviraj Chavan and Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News : '' मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदेच राहणार !'', चव्हाणांना फटकारत फडणवीसांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले असतानाच पृथ्वीराज चव्हाणांनी मोठं विधान करत थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांनाच बोलतं केलं. तर फडवीसांनीही यावर आपली प्रतिक्रिया देत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.

पृथ्वीराज चव्हाण हे अजितदादांबद्दल बोलताना म्हणाले, "शिवसेनेचे 16 आमदार येत्या 10 ऑगस्टला विधानसभेचे अध्यक्ष अपात्र करतील, त्याचवेळी अजित पवारांना मुख्यमंत्री करतील. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात येईल", असा दावा चव्हाणांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता.

Prithviraj Chavan and Devendra Fadnavis
Ajit Pawar News : 'उगाचच वाद वाढवू नका...' अजितदादा अतिउत्साही कार्यकर्त्यांवर दरडावले!

चव्हाणांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली. या सर्व चर्चांवर अखेर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करत चव्हाणांचा दावा खोडून काढला.

मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे हेच कायम राहणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. एवढंच नाही तर शिंदे हेच मुख्यमंत्री असतील यावर, उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतही चर्चा झाली होती, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com