Eknath Shinde News : राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्ममंत्रीपदाच्या शुभेच्छा देऊन राजकीय गोंधळ उडविणाऱ्या स्व:पक्षातील नेत्यांमुळे अजितदादांची शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अडचण होऊ शकते. त्यामुळे विरोधकांना बळ मिळेल, सरकारमध्ये अस्थिरता पसरेल अशी विधाने आपल्याच नेत्यांकडून होणार नाहीत, याची काळजी अजितदादा घेऊ लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून आपल्याला मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिलेलेल्या अतिउत्साही नेत्यांना अजितदादांनी तंबीच दिली. 'उगाचच नको ते वाद ओढवून घेऊ नका, अडचणी आणू नका असा सल्ला वजा आदेशच अजितदादांनी आपल्या हितचिंतकांना दिला आहे.
दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडेच राहणार असल्याचे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) जाहीरपणे सांगावे लागले आहे. त्याचाच अर्थ मुख्यमंत्री पदावरुन शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारमध्ये उलटसुलट चर्चा असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी सावधगिरी म्हणून स्व: पक्षाील नेत्यांची कानउघडणी केली. गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र होतील आणि त्यानंतर अजितदादा मुख्यमंत्री होतील. अशा अटकळी बांधल्या जात आहेत. त्यावरुन विरोध शिंदेंना लक्ष करीत आहेत. त्याचे मुख्यमंत्रीपद जाणार असल्याचे सांगत आहेत.
तर राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचे बोलत आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवारांच्या नेतृत्वातील महायुतीत बिघाडीची भीती असल्याचे बोलेल जात आहे. त्यात अजितदादांचे समर्थ अमोल मिटकरींनी ट्वीट केल्याने मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीतच गोंधळ उडाला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भर घातली आणि भाजपकडून (BJP) अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचे छातीठोक पणे सांगितले. त्यावर फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. मात्र, अजितदादांची डोकेदुखी वाढवणाऱ्या नेत्यांना त्यांनीच रोखण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार असताना त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणे योग्य नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली. या माध्यमातून ट्वीट, बॅनर आणि माध्यमांसमोर बोलणाऱ्या नेत्यांना अजित पवार यांनी आवर घातला. मिटकरी यांच्या ट्वीटनंतर मंत्री दिपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सरकारमध्ये कोणतेही वाद नको, असीच भूमिका पवारांनी घेतली आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.