Ram Satpute
Ram SatputeSarkarnama

Ram Satpute : सोलापुरात हरुनही नवा कॉन्फिडन्स घेऊन राम सातपुते विधान भवनात!

Assembly Monsoon Session : विरोधकांच्या टीकेला राम सातपुते यांनीही त्याच भाषेत प्रत्युतर दिले होते. मात्र, मोहिते पाटील यांच्या टीकेला सातपुते यांनी निकालापर्यंत उत्तर दिले नव्हते.

Mumbai, 27 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव... विरोधी काँग्रेस नेत्यांकडून जिव्हारी लागणारी झालेली टीका...मोहिते पाटलांकडून आव्हानाची भाषा, अगदी बीडचं पार्सल एका रात्रीत परत पाठवण्याची दिली गेलेली धमकी हे सर्व विसरून आमदार राम सातपुते हे नवा कॉन्फिडन्स घेऊन आज पुन्हा त्याच जोशात आणि आवेशात पावसाळी अधिवेशनासाठी विधान भवनात दाखल झाले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session ) आजपासून (ता. 27 जून) सुरुवात झाली. या अधिवेशनासाठी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) हे पहिल्याच दिवशी हजर झाले आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुते यांचा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्याकडून तब्बल 74 हजार मतांनी पराभव झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसकडून राम सातपुते यांच्या छप्पराच्या घरापासून आता बांधण्यात आलेल्या बंगल्यापर्यंत सर्व काही प्रचारात काढण्यात आले होते. विरोधकांकडून झालेले हे घाव वर्मी बसणारे होते.

अकलूजच्या मोहिते पाटील यांनीही सातपुते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवेशाच्या कार्यक्रमात तर ‘बीडचे पार्सल एका रात्रीत परत पाठवण्याची आपली हिम्मत आहे’ अशा शब्दांत सातपुते यांना आव्हान देण्यात आले होते.

Ram Satpute
Samadhan Autade : समाधान आवताडे यांचे ‘प्रमोशन’; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोपवली मोठी जबाबदारी

अर्थातच, विरोधकांच्या टीकेला राम सातपुते यांनीही त्याच भाषेत प्रत्युतर दिले होते. मात्र, मोहिते पाटील यांच्या टीकेला सातपुते यांनी निकालापर्यंत उत्तर दिले नव्हते. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संकल्प मेळाव्यात सातपुते यांनी माझं पार्सल बीडला परत पाठवण्याची भाषा करण्यात आली. मात्र, मी कोठेही जाणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आणि शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत माळशिरसच्या मातीतच गाडून घेईन. माझे अंत्यसंस्कार हे माळशिरसच्या मातीतच होतील, अशी जनतेला भावनिक साद घालत विधानसभेसाठी मोहिते पाटील यांना आव्हान दिले होते.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात तब्बल 74 हजार मतांनी झालेला पराभव आणि विरोधकांकडून झालेले वर्मी घाव बाजूला ठेवून राम सातपुते हे पुन्हा नव्या जोमाने पुन्हा त्याच जोशाने कामाला लागले आहेत.

मागील आठवड्यात माळशिरसमधील भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. आता तोच जोश आणि आवेश घेऊन विधानसभेची आगामी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने अधिवेशनासाठी विधानसभेत दाखल झाले आहेत.

Ram Satpute
Video Devendra Fadnavis Meet Uddhav Thackeray : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंशी भेट, एकाच लिफ्टमधून...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com