Mumbai News : मुंबईसह राज्यभरात सर्वत्र दहीहंडीचा उत्सवाचा जल्लोष सुरू आहे. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमुळे आपल्याच दहीहंडीच्या जोरदार चर्चा होण्यासाठी राजकीय नेत्यांनी पाण्यासारखा पैसा ओतत चांगलाच जोर लावल्याचं दिसून येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध नेतेमंडळी शनिवारी (ता.16) दिवसभरात मुंबईतील कार्यक्रमांना भेटी देत आहेत. यात फडणवीसांनी आता हीच संधी साधत वरळीतील परिवर्तन दहीहंडी उत्सवापासून याची सुरुवात केली.
देवेंद्र फडणवीसांनी वरळीतील परिवर्तन दहीहंडी उत्सवाला भेटी देण्यास सुरुवात केली. तसेच ते आमदार राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिममधील दहीहंडीही सहभागी होते. याचठिकाणी फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनाही (Uddhav Thackeray) ललकारलं आहे.
फडणवीस म्हणाले, यंदाच्या वर्षी महानगरपालिकेमध्ये परिवर्तन अटळ असून पापाची हंडी आम्ही फोडली आहे. आता तिथे विकासाची हंडी लागली जाईल आणि त्यातील लोणी सर्वसामान्यांना वाटलं जाणार, अशा शब्दांत मुंबई महापालिका निवडणुकांचा आखाडा तापवला आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आत्तापर्यंत महापालिकेतील लोणी कुठे जात होतं,हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझ्या तोंडून काढायचा प्रयत्न करताय,पण जनतेलाही माहीत आहे, ते लोणी कुणी खाल्लं, असा अप्रत्यक्ष टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
दुसरीकडे मनसे व शिवसेनेच्यावतीनेही मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून ठाण्यात राजन विचारेंकडून निष्ठेची दहीहंडी फोडली जाणार आहे. तर पत्रकारांशी बोलताना यंदा मुंबई महापालिकेत परिवर्तन अटळ असल्याचं त्यांनी म्हटलं.
मुंबईत भाजप,शिवसेना,मनसेच्या वतीनं यावर्षी दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. या उत्सवात गोविंदा पथकांचे उंचच उंच मनोऱ्यांचे थर पाहायल,कलाकारांची हजेरी,सेलिब्रिटींचा आकर्षक डान्स पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे
मराठीच्या मुद्द्यांवरुन एकत्र आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही युती होण्याची शक्यता आहे.याची सुरुवात शिवसेना आणि मनसेच्या कामगार संघटना बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आले आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे बंधूंच्या विरोधात भाजपने रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे आगामी काळात होता असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच होणारी ही लढत लिटमस टेस्ट ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात कोणाचे पारडे जड राहणार हे समजणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.