Devendra Fadnavis: फडणवीस अचानक दिल्लीला रवाना, अमित शहांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद; सरकारमध्ये नेमकं काय सुरु?

Devendra Fadnavis Delhi Visit: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अमित शहा उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत
Amit Shah-Devendra Fadnavis
Amit Shah-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis Delhi Visit: गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात वेगवेगळ्या घडामोडी सुरु आहेत. त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा, केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार, विविध पेपरफुटींचा विषय यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. तर, दुसरीकडे उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर असून ते पत्रकार परिषदही घेणार आहेत. त्यामुळे सरकारमध्ये नेमक काय सुरु आहे. याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या घटनात्मक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपकडून 'सेवा संकल्प अभियान' राबवले जाणार आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या महीन्याभराच्या कालावधीत हे अभियान सर्व देशभरात राबविले जाणार आहे. या अभियानाची माहिती देण्यासाठी गृहमंत्री मुंबईत येणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रांताध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याबरोबरच महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अभियाना व्यतिरिक्त ते कुठल्या मुद्द्यावर बोलणार हे महत्वाचे आहे.

देशात होणारी पुढील लोकसभेची निवडणूक नरेंद्र मोदी लढवणार का? याची चर्चा आतापासूनच राजकीय वर्तृळात रंगली आहे. मोदी हेच पुढील पंतप्रधान पदाचे दावेदार असल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे. त्यांचा वाढदिवस हा सेवा संकल्प दिवस म्हणून साजरा होतो आहे. त्यात केंद्रात लवकरच मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली भेटीनंतर ते या मंत्रीमंडळ विस्तारात काही मुख्य भूमिका पार पाडणार किंवा कुणाची शिफारस करणार का? याबाबत उत्सुकता असणार आहे.

Amit Shah-Devendra Fadnavis
'खरा बाप कोण हे जनतेने दाखवले'; शिवसेनेच्या आमदाराचे नाव न घेता श्वेता महालेंचा टोला

देवेंद्र फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रातच कार्यरत राहणार आहोत असे आधीच स्पष्ट केले आहे. तरी विरोधकांकडून त्यांच्या दिल्ली भेटींवर सातत्याने टीका केली जाते. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार, अमित शहा यांचा मुंबई दौरा आणि स्थानिक नेत्यांची उपस्थिती यावरून येणार्‍या काळात राजकारणात काही वेगळे समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Amit Shah-Devendra Fadnavis
Vilas Ghule Death Case: खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाच्या अटकेसाठी बीड-केज महामार्ग रोखला! विलास घुलेचे नातेवाईक आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com