BMC election survey: मुंबई महापालिकेत दिसणार फडणवीसांचाच जलवा.. एकत्र येणाऱ्या ठाकरे बंधूंची धाकधूक वाढवणारा सर्वे!

Mumbai municipal corporation survey News: मुंबईतील नागरिकांच्या कलांचा विचार करता महायुती व महाविकास आघाडी एकत्रित की स्वबळावर निवडणूक लढविणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray .jpg
Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिल्याने आता प्रशाकीय पातळीवर वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यातच निवडणुकीसाठी राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या असल्याने त्याचा परिणामही नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणावर दिसून येत आहे. विशेषतः मुंबई महापलिकेवर कोणत्या पक्षाचे वर्चस्व असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबईतील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतेच 'विकली वाईब'ने सर्वेक्षण केले आहे. या सर्व्हेक्षणात पुढे आलेली आकडेवारी लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे सर्वच जणांची उत्सुकता ताणली गेली आहे. येत्या काळातील मुंबईतील नागरिकांच्या कलांचा विचार करता महायुती व महाविकास आघाडी एकत्रित की स्वबळावर निवडणूक लढविणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray .jpg
Fadnavis on Rahul Gandhi : राहुल गांधींच्या 'पाच' टप्प्यांची CM फडणवीसांकडून चिरफाड; एका लेखात विषयच संपवला!

या सर्वेक्षणानुसार मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याच्या शर्यतीत भाजप सर्वात आघाडीवर आहे. तर शिवसेनेत (Shivsena) फूट पडून देखील उद्धव ठाकरे यांचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार नगरसेवक आणि प्रशासक या दोन्हींच्या प्रगती पुस्तकावर मुंबईकरांनी फुली मारली आहे.

दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालविण्यासाठी उद्धव आणि राज एकत्र आले तर त्यांना मुंबईकरांचा मोठा पाठिंबा या सर्वेक्षणातून मिळाला आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे व शिवसेना ठाकरे गटाची युती झाली तर मुंबई महापालिकेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray .jpg
Rahul Gandhi article controversy : राहुल गांधींचा लेख त्यांच्यावरच उलटणार? 2004 अन् 2009 ची आकडेवारी करतीय अडचण

मुंबईतील महापालिका निवडणूका सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढल्या तर कोणाला पाठींबा? देणार या प्रश्नावर 31.0 टक्के नागरिकांनी भाजपला (BJP) पाठींबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर 23.9 टक्के जणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. तर मनसेला 11.2 टक्के लोकांनी पाठींबा दिला आहे. तर एकनाथ शिंदे यांना 6.3 टक्के जणांनी पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे राज व उद्धव ठाकरे एकत्र आले व दुसरीकडे भाजप व एकनाथ शिंदे एकत्र आले तर ही लढत चुरशीची होऊ शकते.

Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray .jpg
Raj-Uddhav Thackeray Alliance: राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्यास नाशिकमध्ये होणार 'या' पक्षांची अडचण?

दुसरीकडे येत्या काळात जर बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर पाठींबा द्याल का? या प्रश्नावर राज आणि उद्धव ठाकरे युतीला 52.1 टक्के तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 26.2 टक्के तर काही सांगू शकत नाही असे 21.8 टक्के लोकांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray .jpg
Raj Thackrey politics: विज्ञाननिष्ठ राज ठाकरेंच्या सैनिकांना वास्तूशाश्त्राच्या मोहात, बदलली पक्ष कार्यालयाची दिशा, मनसेची दशा बदलणार का?

या सर्वेक्षणानुसार तुमच्या स्थानिक नगरसेवकाच्या कामगिरीवर खुश आहात काय ? अशा विचारलेल्या प्रश्नावर तब्बल 28.9 टक्के मुंबईकरांनी संपूर्ण असमाधानी असे म्हटले आहे. तर 20.9 टक्के मुंबईकरांनी नगरसेवकांची कामगिरी समाधानी असल्याचे म्हटले आहे. 18.7 टक्के नागरिकांनी समाधानीही नाही आणि असमाधानीही नाही असे म्हटले आहे. तर 12.2 टक्के मुंबईकरांनी सांगू शकत नाही असे म्हटले आहे. वयोगटाचा विचार करता 18-24 वयोगटातील 39 टक्के तरुणांनी स्थानिक नगरसेवकांची कामगिरी समाधानकारक असे म्हटले आहे. तर नगरसेवकांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे 25-34 वयोगटातील 36 टक्के तरुणांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray .jpg
NCP unity : ठाकरे बंधू थेट बातमी देण्याच्या तयारीत असतानाच, मिटकरींनी अजितदादा अन् सुप्रियाताई एकत्र येण्याचा 'मुहूर्त' सांगितला

मुंबई महापालिकेचा शिवसेनेचा महापौर असतानाच्या 2017 ते 2022 च्या काळाच्या तुलनेत आताची एनडीएची प्रशासकीय राजवट कशी आहे का ? या प्रश्नाला 20 टक्के मुंबईकरांनी सर्वात वाईट असे म्हटले आहे. तर 19.9 टक्के मुंबईकरांनी बऱ्याच प्रमाणात चांगली म्हटले आहे. तर 17.1 टक्के मुंबईकरांनी सारखीच असल्याचे म्हटले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप तीन महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणूका जवळ येतील त्या प्रमाणात वातावरणात बदल जाणवू शकतो. त्यामुळे सर्वांचेच आतापासूनच आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray .jpg
BJP vs Congress : भाजपचा धुव्वा, विद्यमान मंत्री अन् आमदारालाही दणका : क्लिन स्वीप देत 'काँग्रेसने' जिंकल्या सगळ्या जागा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com