BJP Vs Shivsena : भाजपने तुटेपर्यंत ताणलं पण एकनाथ शिंदेंसोबतच युती केली; पडद्यामागं असं काय घडलं? देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं

Thane Politics Devendra Fadnavis Eknath Shinde : 25 वर्षांपासून शिवसेना हा ठाण्यातील प्रमुख राजकीय घटक पक्ष राहिलेला आहे, असे फडणवीस म्हणाले.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

Devendra Fadnavis News : राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेचे मुख्यनेते म्हणून एकनाथ शिंदे हे पक्ष चालवीत आहेत. त्यात ठाणे हे बाळासाहेबांचे विशेष प्रेम असलेले शहर असून शिंदे यांची राजकीय ओळख असलेले शहर आहे. त्यांच्या शहरात त्यांचे मन दुखावणे चुकीचे ठरले असते. त्यामुळे आम्ही शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी युती बाबतच्या प्रश्नाचा उलगडला केला.

भाजप आज एक प्रमुख पक्ष आहे. ठाण्यामध्ये वर्षानुवर्षे शिवसेना मजबूतपणे लढलेली आहे आणि २५ वर्षांपासून शिवसेना हा ठाण्यातील प्रमुख राजकीय घटक पक्ष राहिलेला आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही कार्यकर्त्यांची ही भावना आमच्यासमोर मांडली होती. मात्र, या नव्या राजकीय परिस्थितीत आम्ही सर्वांनी मिळून एकत्र विचार केला, असे देखील ते म्हणाले.

आजची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना असून, तिचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. शिवसेना ते चालवत आहेत, हे वास्तव आहे. अशा वेळी केवळ काही जागांच्या गणितासाठी वेगवेगळे लढलो असतो, तर कदाचित सत्ता मिळालीही असती. पण त्यातून कुठेतरी मनदुखावणी झाली असती, असे देखील त्यांनी सांगितले.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Nashik NMC Election : १९९७ पासून भाजपचा गड असलेल्या प्रभागात रंजना भानसी पुन्हा मैदानात, नवख्या गणेश चव्हाणांशी लढाई

हा योग्य निर्णय...

ठाणे शहर हे बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत आवडते शहर होते, तिथे मित्रपक्षांमध्ये वादविवाद आणि संघर्ष होणे योग्य नव्हते. म्हणूनच आम्ही ठरवले की, आवश्यकता पडली तर थोडी पडती बाजू घ्यायची, कमी जागा स्वीकारायच्या. पण युतीतच लढायचे. मी आणि रवींद्र चव्हाण यांनी ही भूमिका आमच्या टीमसमोर मांडल्यानंतर सर्वांनी समजूतदारपणे त्याला मान्यता दिली. त्यामुळे आज आम्ही एकत्र लढत आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की हा निर्णय योग्य आहे.

ब्रँडचा बँड वाजवू...

महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकमेव खरा ब्रँड होता. त्यांच्यानंतर महाराष्ट्रात कोणताही वैयक्तिक ब्रँड उरलेला नाही. मात्र, माझी आणि एकनाथ शिंदे यांची महायुती इतकी मजबूत आहे की कोणीही स्वतःला ब्रँड म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा बँड वाजविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे बंधूवर केली.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Shiv Sena UBT Politics : उद्धव ठाकरेंच्या माजी आमदाराने, भाजपात गेलेल्या विनायक पांडेंचा पंचनामाच केला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com