Devendra Fadnavis Political News : 'पुन्हा येईन'च्या तोऱ्यातील फडणवीस आता 'उपमुख्यमंत्री'पदावरच समाधानी...!

Maharashtra Politics : '' २०१९ सालचे दुसरे हिरो आमचे दादा आहेत. कारण...''
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

Mumbai : मी पुन्हा येईन, पुन्हा येईन असे सांगून तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत आपली राजकीय हवा केली होती. फडणवीसांच्या या आत्मविश्वासावरून विरोधकांनी त्यांना हिणवले,स्व:पक्षातून नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा होती. यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस या पदापासून लांब गेले.

यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन ठाकरे सरकार कोसळले आणि नवे समीकरण जुळले, तेव्हा एकनाथ शिंदेंच्या मदतीने देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी अटकळ बांधली गेली. पण झाले उलट, शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसले आणि फडणवीसांची संधी हुकली. त्यावरही 'पुन्हा येईन'ची उलटसुलट चर्चा झाली. पण याच फडणवीसांनी आता आपण मुख्यमंत्री होणार नसल्याचे स्पष्ट संकेत देतानाच सभागृहात सर्वांसमक्ष आपण आहे त्या उपमुख्यमंत्रीपदावरच समाधानी असल्याचे सांगितले आहे.

Devendra Fadnavis
BRS News : बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात मिळाला दुसरा सरपंच..

राज्याचे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत गुरूवारी विधानसभेचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनपर भाषणात तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी वडेट्टीवारांच्या राजकीय कारकीर्दीचा मागोवा घेतानाच २०१९ पासूनच्या आत्तापर्यंतच्या राजकीय घडामोडींवर देखील भाष्य केले.

फडणवीस म्हणाले, २०१४ च्या काळात अखेरच्या टप्प्यात राधाकृष्ण विखे पाटील आमच्याकडे आले तेव्हा वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली. अतिशय कमी कालावधीत देखील आपण सभागृहात छाप पाडण्याचा प्रयत्न केला. २०१९ साल हे वेगळंच आहे. कारण आमच्या मुख्यमंत्र्यांनी वेगळाच पराक्रम केला. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी सत्तापरिवर्तन केले आणि ते मुख्यमंत्री झाले. अतिशय चांगले काम ते करत आहेत.

Devendra Fadnavis
Jayant Patil-Narayan Rane : राणेंनी माझ्यासाठी सूट शिवून घेतला अन्‌ तो घालूनच मी अर्थसंकल्प मांडला; जयंत पाटील

२०१९ सालचे दुसरे हिरो आमचे दादा आहेत. कारण २०१९ दादा माझ्यासोबत उपमुख्यमंत्री झाले, उध्दव ठाकरेंसोबत उपमुख्यमंत्री झाले. आणि परत आता उपमुख्यमंत्री झाले आहेत.

त्यांच्या खालोखाल मी असल्याचेही फडणवीसांनी यावेळी सभागृहात सांगितले. ते म्हणाले, आधी मुख्यमंत्री झालो, नंतर विरोधी पक्षनेता झालो, आता उपमुख्यमंत्री आहे. पण आता काही बदल होणार नाही. आम्ही तिघेही ज्या पदावर आहोत, त्या पदावरच राहणार आहोत. आणि अतिशय उत्तम काम आम्ही करणार आहोत असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.

'' या जबाबदारीत मी अतिशय आनंदी...''

पाचवर्ष मुख्यमंत्री म्हणून अतिशय योग्य काम केले आहे. ज्यामुळे आता जी जबाबदारी मिळाली, ती उत्तमप्रकारे पार पाडणार आहे असेही फडणवीस यावेळी म्हणाले. या जबाबदारीत मी अतिशय आनंदी आहे. काम करण्यात अतिशय मजा येतेय. चांगले सहकारी आहेत. त्यामुळे त्यात काही वावगं वाटत नाहीये असेही फडणवीस यांनी सांगितले.

वडेट्टीवारांचं कौतुक...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विजय वडेट्टीवार(Vijay Vadittiwar) यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले. ते म्हणाले, विदर्भाचा बुलंद आवाज असणारे आमचे मित्र विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली, त्यांचं मी अभिनंदन करतो. या सभागृहाला अतिशय सक्षम विरोधी पशक्षनेत्यांची मांदियाळी पाहायला मइळते. ज्या नेत्यांनी आपल्या प्रभावाने जनसामान्यांच्या भल्याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेत चांगले निर्णय करुन घेतले. प्रसंगी जिथे सरकार चुकले, त्याठिकाणी शासनाला धारेवर देखील धरले.

ज्यावेळी संपूर्ण सभागृहाचा सूर एकत्र असला पाहिजे. अशावेळी अतिशय ताकदीने एकसुरानं एकदिलानं प्रस्ताव मान्य झाल्याचे देखील या सभागृहाने पाहिले आहे. या पदाचा मान सन्मान वाढविण्याकरिता ते निश्चित चांगलं काम करतील असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Devendra Fadnavis
Monsoon Session News : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष नाही, जयंत पाटलांचा टोमणा; अन् अजितदादांच्या उत्तराने सभागृहात एकच हशा

''जमिनीशी जुळलेला नेता...''

एक गोष्ट मी आजच सांगू इच्छितो, अध्यक्ष महोदय ,तुम्ही वडेट्टीवार यांना माईक सुरु करा किंवा सुरु करु नका करा ह सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांचा आवाज माईकपेक्षा मोठा आहे. ती चंद्रपूर जिल्ह्यातील काँम्पिटेशन आहे. सूधीर मुनगंटीनवार हे देखील एख किलोमीटरवरून आल्याचं आपल्या लक्षात येते. त्यामुळे बुलंद आवाज आहे.त्यामुळे विदर्भाचे प्रश्न असतील किंवा ओबीसींचे प्रश्नाविरोधात त्यांनी कायमच आवाज उठवला आहे. त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा आपल्याला होईल. जमिनीशी जुळलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते असेही फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना प्रसंगी आक्रमकता लागते, पण त्याचवेळी वास्तवाचं भान ठेवून कुठे आपण माघार घ्यायला हवी हे देखील लक्षात ठेवावं लागतं. कधी कधी सभागृहाचं कामकाज बंदही पाडावं लागतं. पण ते सातत्यानं बंद पाडलं तर विरोधी पक्षाचंच जास्त नुकसान होते याची जाणीवही फडणवीसांनी वडेट्टीवारांना करून दिली.

Devendra Fadnavis
Kavita Mhetre News: भिडे यांच्या मिशा काढणाऱ्या व्यक्तीला एक लाख इनाम... राष्ट्रवादीच्या नेत्या कविता म्हेत्रेंची घोषणा

२०१९ साली महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे खातं मिळायला हवे होते. खाती सर्व चांगलीच असतात, पण जे सिनॅरिटीने मिळायला पाहिजे होते. ते काही मिळालं नाही. मग आम्हांला वडेट्टीवार नाराज असल्याच्या बातम्या वाचायला मिळाल्या. त्यानंतर नाना पटोले मुख्यमंत्री होत असल्याचं ऐकायला मिळालं. वडेट्टीवार अध्यक्ष होत असल्याचं कानावर आले. पण अर्थात हे सर्व बातम्यांमधून वाचायला मिळाले. पण अर्थात त्यांनी आरएनआरसारखं खात्याचा चार्ज सांभाळला आणि ते महत्वाचे खाते जिवंत करण्याचे काम त्यांनी केल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com