Devendra Fadnavis Video : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस 'अ‍ॅक्शन मोड'वर, अधिकाऱ्यांना म्हणाले...

Cabinet meeting Devendra Fadnavis : गेली अडीच वर्ष शिंदेंच्या नेतृत्वात सरकार चालवलं. अतिशय गतिशील असं ते सरकार होतं. त्यामुळे आम्ही जाहिरात करताना म्हणतो होतो की महाराष्ट्र आता थांबणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : महाराष्ट्राचे 21 मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या शपथविधीनंतर फडणवीसांनी पहिली कॅबिनेटची बैठक घेतली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे या आपल्या उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेतलेल्या या बैठकीत फडणवीसांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना केली.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,'आम्ही बैठकीत अधिकाऱ्यांच्या सांगितले की मागच्या काळात मी आणि एकनाथ शिंदे जेव्हा सत्तेत होतो तेव्हा 50-50 ओव्हरची मॅच सुरू होती. त्यानंतर अजित पवार आले तेव्हा वेळ कमी होता ती 20-20 मॅच होती. मात्र, आता टेस्ट मॅच आहे. त्याच्यामुळे नीट योग्य प्रकारे धोरणात्मक निर्णय घेत आपल्याला राज्याला पुढे न्यायचे आहे'.

'मला विश्वास आहे वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. पायाभूत प्रकल्प सुरू केले आहेत. सामाजिक क्षेत्रातील लाडकी बहीण सारखे योजना, मुलींची 100 टक्के फी देण्याची योजना हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत. आम्ही आमच्या वचनाम्यात, जाहीरनाम्यात जीजी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी पावलं उचलायची आहेत.', असे फडणवीस म्हणाले.

 Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : 'एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी...'; ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर शपथविधीनंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, "मी त्याचवेळी..."

आम्ही थांबणार नाही...

गेली अडीच वर्ष एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सरकार चालवलं. अतिशय गतिशील असं ते सरकार होतं. त्यामुळे आम्ही जाहिरात करताना म्हणतो होतो की महाराष्ट्र आता थांबणार नाही. अडीच वर्षात महाराष्ट्राने गती घेतली आहे ही गती थांबणार नाही. त्याच गतीने विकासाकडे जाऊ. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी राहिल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

 Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis Big Statement : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांची मोठी कबुली; म्हणाले, 'माझ्याकडे अनुभव, तरीही यावेळी...'

रोल बदलले पण दिशा नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी 2014 मुख्यमंत्री होतो तेव्हा एकनाथ शिंदे माझ्यासोबत मंत्रिमंडळात होते. 2019 ला थोडा काळ मी मुख्यमंत्री होतो आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते. नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते मी उपमुख्यमंत्री होतो. आता आमचे रोल बदलले असले तरी दिशा बदलली नाही. कामात तीच गती असेल समन्वय असेल वेगळेपण पाहायला मिळणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com