.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपनं तब्बल 132 जागा जिंकत महायुतीतला सर्वात मोठा पक्ष ठरला होता.त्यातच मुख्यमंत्रीपदही भाजपकडे आल्यामुळे सरकार आणि राज्यातही त्यांचा वरचष्मा असणार यात शंका नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये असतानाच भाजपच्या पक्षसंघटनावर भर दिला आहे. तसेच सरकार आणि संघटन यांच्या समन्वयासाठीही मोठी पावले उचलली आहे. याचाच भाग म्हणून भाजपनं (BJP) ज्या जिल्ह्यात पक्षाचा पालकमंत्री नाही,तिथे संपर्कप्रमुख या पदाची नियुक्ती करण्यात आली आहे.
महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मंगळवारी (ता.4) संपर्कमंत्री पदांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ज्या ठिकाणी मित्रपक्षांचे पालकमंत्री आहेत, त्याचठिकाणी भाजपने संपर्कमंत्री नेमले आहे. 17 जिल्ह्यांत संपर्कमंत्र्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे.
संपर्कमंत्री नेमण्याची मुभा ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी संपर्कमंत्री नेमले तरी आमचे काही म्हणणे नाही. आमचे 19 ठिकाणी पालकमंत्री आहेत. या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
पण महायुतीत पालकमंत्रिपदावरून तीव्र नाराजी असतानाच भाजपनं संपर्कप्रमुख हे नवं पद निर्माण करुन मोठी यशस्वी खेळल्याचे बोलले जात आहे. संपर्कमंत्र्यांची नियुक्ती करुन अप्रत्यक्षपणे भाजपनं मित्रपक्षांच्या पालकमंत्र्यांवरच दबाव कसा राहील याची काळजी घेतल्याची चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही चाल मित्रपक्षांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.
प्रचंड बहुमत असतानाही सरकारमधील नाराजी वारंवार उफाळून येत असल्याचे लपून राहिलेली नाही. मुख्यमंत्रीपद, मंत्रिपदंं, मंत्रिमंडळ विस्तार,खातेवाटप आणि त्यानंतर पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील घटक पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. तसेच भाजपमध्येही मंत्रिपदं, पालकमंत्रिपदं यांवरुन नाराजी उद्भवली आहे. तीच शमविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यातून सुवर्णमध्य काढत भाजपमधील कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी संपर्कमंत्री हे नवं पद निर्माण केल्याची चर्चा आहे.
महायुती सरकारमध्ये ज्या जिल्ह्यांत भाजपचा पालकमंत्री नाही, तिथे पक्षाचा संपर्कमंत्री भाजप कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. त्या समस्याचा निराकरण करण्यासाठी पालकमंत्री आणि पदाधिकारी- कार्यकर्ता यांच्यातला दुवा म्हणून काम पाहणार आहे. भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या संघर्षात कार्यकर्त्यांची फरपट होऊ नये हाही यामागचा मुख्यमंत्री फडणवीसांचा हेतू असल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपनं ठाणे- गणेश नाईक, बीड- पंकजा मुंडे, संभाजीनगर- अतुल सावे,पुणे- चंद्रकांत पाटील, कोल्हापूर- माधुरी मिसाळ,रत्नागिरी- आशिष शेलार, धाराशिव- जयकुमार गोरे,सातारा - शिवेंद्रराजे भोसले यांंच्यासह एकूण 17 जिल्ह्यांत हे संपर्कमंत्री काम पाहणार आहेत. संपर्कमंत्री हे कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यावर पक्षाचा भर देण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेचे कोणतेही काम अडू नये तसेच सरकारमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचाही सहभाग असावा, यासाठी संपर्कमंत्री कार्यरत राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.