Devendra Fadnavis Meet Aaditya Thackeray : ठाकरे- फडणवीस भेटीचा पुन्हा 'योगायोग'; आधी 'लिफ्ट'मध्ये उद्धव भेटले आता 'लॉबी'त आदित्य..!

Maharashtra Monsoon Session 2024 : विधानभवनाच्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होऊन आठ दिवस होत नाही, तोच दुसर्‍यांदा ठाकरे - फडणवीस भेट घडून आली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Devendra Fadnavis Uddhav Thackeray- Aaditya Thackeray
Devendra Fadnavis Uddhav Thackeray- Aaditya ThackeraySarkarnama

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विस्तवही जात नाही. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर तसेच शिवसेना फुटीनंतर तर संघर्ष एकदम टोकाला गेला. पण पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेले फडणवीस आणि ठाकरे यांची भेट झाली.

एवढंच नाही तर दोघांनी लिफ्टमधून प्रवासही केला होता.या भेटीनंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. या भेटीची चर्चा थांबत नाही, तोच आता पुन्हा एकदा ठाकरे - फडणवीस भेटीचा दुसरा अंक मंगळवारी (ता.2 जुलै) दिसून आला. पण यावेळी उद्धव नव्हते तर आदित्य ठाकरे आणि फडणवीस समोरासमोर आले.

विधानभवनाच्या लॉबीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची काही क्षणांची भेट झाली. विधानभवनाच्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होऊन आठ दिवस होत नाही, तोच दुसर्‍यांदा ठाकरे - फडणवीस भेट घडून आली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आणि विधान परिषदांच्या निवडणुकांमुळे सत्ताधारी - विरोधक यांच्यात आरोप- प्रत्यारोपांचं घमासान सुरू आहे.तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे- भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यातला वाद टोकाला गेला असतानाच दुसरीकडे देवेंद्र फडणवीस- आदित्य ठाकरे यांची भेट झाली.यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे एकमेकांना भेटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झालेल्या मिलिंद नार्वेकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे विधानभवनात आले होते.याचवेळी तिथून देवेंद्र फडणवीस हे जात होते. त्यावेळी फडणवीस आणि ठाकरे यांच्यात संवाद साधला. तसेच दोन्हीही नेत्यांमध्ये हास्यविनोद झाल्याचे पाहायला मिळाले.

भेटीत फडणवीस - ठाकरेंना काय म्हणाले...?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंकडे (Aaditya Thackeray) बघत म्हणाले, नमस्कार,काय चाललंय? त्यावर आदित्य ठाकरे यांनी 'मी लिफ्टमधून चाललोय.असं उत्तर दिले.आदित्य यांच्या या उत्तरावर फडणवीस दिलखुलासपणे हसले. ठाकरेही खळखळून हसले.यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.यानंतर दोन्ही नेते आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले.

तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांचीही गळाभेट झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

लिफ्टमधील भेटीनंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले..?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या लिफ्टमध्ये समोरासमोर आले होते.या दोघांनी एकत्रितपणे लिफ्टमधून प्रवासही केला होता.लिफ्टमध्ये ठाकरे अन् फडणवीसांमध्ये चर्चाही झाली होती.

Devendra Fadnavis Uddhav Thackeray- Aaditya Thackeray
BJP News : भाजपची मेहरनजर; केंद्रापासून ते विधानपरिषदेपर्यंत पुण्यातील नेत्यांची वर्णी का?

या भेटीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते,मी आणि देवेंद्रजी यांच्यासोबतचा लिफ्ट प्रवास हा योगायोगच म्हणावा लागेल.भिंतीला कान असतात, लिफ्टला कान नसतात,त्यामुळे यापुढेही गुप्त बैठक तिथेच करू, अशी मिश्किल टिप्पणीही ठाकरे यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com