Sanjay Raut : "मराठी भाषेसाठी हिंसाचार करणारच, काय उखडायचं ते उखडा…"; राऊतांचा फडणवीसांना इशारा, नेमकं काय म्हणाले?

Marathi Language Politics : "मराठी आलीच पाहिजे, पण मातृभाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणारच, भाषेवर वाद होऊ नये", असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधुंना दिला आहे. फडणवीसांच्या याच वक्तव्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत जोरदार हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut on Devendra Fadnavis
Sanjay Raut on Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 03 Aug : "मराठी आलीच पाहिजे, पण मातृभाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणारच, भाषेवर वाद होऊ नये", असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधुंना दिला आहे.

फडणवीसांच्या याच वक्तव्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाय मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणारच काय उखडायचं आहे ते उखडून घ्या, असा इशाराच राऊतांनी फडणवीसांना दिला आहे.

शिवाय यावेळी त्यांनी फडणवीसांवर तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात, अशी टीकाही केली. ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे. हे राज्य मराठी माणसाचे आहे. 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिले आहे. तुम्ही नव्हे, तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात.

Sanjay Raut on Devendra Fadnavis
Nitesh Rane : शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारे सनातनी दहशतवादीच! आव्हाडांच्या विधानावर राणेंचा भडका उडाला...

ज्या दिवशी मुख्यमंत्रीपद जाईल त्या दिवशी वेगळा विदर्भ मागाल हे आम्हाला माहितेय. मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर आम्ही होणारच. तुम्ही काय मोरारजी देसाई व्हायला जात आहात का? मराठीचा आग्रह धरतोय म्हणून आमच्यावर गोळ्या घालणार आहात का?

असा सवाल करत आम्ही मराठीचा आग्रह धरतोय आणि धरतच राहणार, असं राऊतांनी फडणवीसांना ठणकावलं. शिवाय आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाही. तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर ती लादा. तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शाह काय म्हणतात ते पहा अमित शहा बोलत आहेत.

Sanjay Raut on Devendra Fadnavis
Fadnavis Tambe beyond politics : फडणवीस अन् तांबेंची मैत्री; बीज कुणी पेरलं? भाजप सोडा काँग्रेसचीही नाही आडकाठी!

आम्ही गुजराती मग मी मराठी का बोलू असं म्हणत आहेत. शिवाय हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. फडणवीस हे अपयशी मुख्यमंत्री असून त्यांचा फक्त फुगा फुगवला आहे. जशी नरेंद्र मोदींची हवा भरलेय तशीच यांच्यात हवा भरली आहे, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com