Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंना मोठा झटका ? 40 गटप्रमुख,10 उपशाखाप्रमुखांसह 150 शिवसैनिक राजीनामा देण्याच्या तयारीत...

Shivsena Political News : शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. यानंतर शिंदे गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाला लागलेली गळती काही केल्या थांबायचं नाव घेताना दिसत नाही.

आता शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत 40 गटप्रमुख, 10 उपशाखाप्रमुखांसह १५० जण सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

Eknath Shinde
Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या समर्थनार्थ अमरावतीत लावलेले बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी फाडले.. ; ...मोहब्बत की जीत

गेली 25 वर्षं मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरची ही पहिली निवडणूक असणार आहे. उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray) सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेंनी ठाकरे गटाला खिळेखिळे करतानाच मुंबईत आपला गड भक्कम करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. मात्र, तरीदेखील मुंबईतील काही भागात ठाकरे गट शिंदे गटावर वरचढ आहे. याचवेळी शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे समोर येत आहे.

मुंबई(Mumbai)तील कांदिवली, चारकोप, मालाडमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याचे बोलले जात असतानाच आता मुंबईतील जोगेश्वरी भागात पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जोगेश्वरी विभागप्रमुखाची निवडीनंतर भागात राजकारण पेटलं असून 150 शिवसैनिक राजीनामा देणार असल्याचा खळबळजनक दावा एका महिला शिवसैनिकाने केला आहे. यात 40 गटप्रमुख, 10 उपशाखाप्रमुखांचा समावेश आहे.

Eknath Shinde
Maharashtra Politics: शरद पवार-अजितदादांच्या गुप्त खलबतांनंतर काँग्रेस 'अलर्ट'; महाराष्ट्रातील घडामोडींवर 'हायकमांड'चं लक्ष

जोगेश्वरी येथील विभागप्रमुख विजय धीवार यांच्या जाचाला कंटाळलेल्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पत्रात एकनाथ शिंदे 24-24 तास काम करतात. मी सुद्धा त्यांच्यासारखा स्वत:ला झोकून देऊन काम करतोय. पण माझ्याविरोधात कटकारस्थान रचलं जात असल्याचा आरोप संबंधित शिवसैनिकाने केला आहे.

दोन महिने शाखा बंद आहे. तोंडी बोललो, लेखी निवेदन दिलं. त्यांनी काही हालचाल केली नाही. बाळासाहेब भवनला पत्र लिहिलं. आता आम्ही सर्व सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहोत असेही ते म्हणाले.

Eknath Shinde
Nagpur District News : चार मिनिटांत संपविल्या मुलाखती, अन् बाहेरगावच्यांना पोलिस पाटील म्हणून निवडले !

माझ्यासोबत 150 शिवसैनिक राजीनामा देणार...

एका महिला शिवसैनिकाने विभागप्रमुखाच्या कार्यपध्दतीवर सडकून टीका करतानाच सामूहिक राजीनाम्याचा इशाराही दिला आहे. माझ्यासोबत 150 शिवसैनिक राजीनामा देणार असं या महिला शिवसैनिकाने दावा केला. यात 40 गटप्रमुख, 10 उपशाखाप्रमुख असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच पक्षात आल्यानंतर दोन महिने व्यवस्थित गेले. पण विभागप्रमुखाची निवड झाल्यानंतर संघटना तुटण्यास सुरूवात झाली असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com