Devendra Fadnavis in Central Politics : देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार?

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहे.
Devendra Fadnavis in Central Politics :
Devendra Fadnavis in Central Politics :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra politics:  राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अण्णा बनसोडे आदि नऊ नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहे. अजित पवार यांच्या बंडाचे सुत्रधार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. एकाच राज्यात दोन उपमुख्यमंत्री राहू शकत नाहीत. दुसरीकडे केंद्रातील मंत्रिमंडळातही मोठे बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devdendra Fadanvis) यांची केंद्रीय मंत्रिमंडळात बोळवण होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Devendra Fadnavis in Central Politics :
Ajit Pawar Deputy CM : अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांचा आकडा समोर; विधानसभेचे 40 तर विधानपरिषदेचे...

दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीपर्यंत महत्त्वाची बैठक पार पडली होती.केंद्रीय मंत्रिमंडळात आणि भाजपमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होऊ शकतात, अशी माहिती या बैठकीनंतर समोर आली होती. तसेच, केंद्र सरकारचाही विस्तार होणार असून त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले होते.गेल्या काही महिन्यांपासून देवेद्र फडणवीस यांच्याही दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या होत्या. त्यामुळे आता जर केंद्रीय मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीसांचीही वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

त्याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही गटातील मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटातील मंत्र्यांना आणि खासकरुन देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात कोणतं पद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.