Assembly Election Strategy : फडणवीस ॲक्शन मोडवर; मुंबई-ठाण्यातील आमदारांसोबतच्या चर्चेतून ठरणार निवडणूक स्ट्रॅटेजी

BJP MLA Meeting : गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री फडणवीस हे निवडणुकीच्या अनुषंगाने आमदारांशी चर्चा करत आहेत. विदर्भ-मराठवाड्याचा आढावा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 06 ऑगस्ट) मुंबई महानगरातील आमदारांची बैठक बोलावली आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 06 August : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तर काही दिवसांपासून बैठका आणि अधिवेशनाच्या माध्यमातून निवडणुकीची पूर्वतयारीला सुरुवात केली आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडवर आले असून ते आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर भागातील भाजप आमदारांसोबत चर्चा करणार आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री फडणवीस हे निवडणुकीच्या अनुषंगाने आमदारांशी चर्चा करत आहेत. विदर्भ-मराठवाड्याचा आढावा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (ता. 06 ऑगस्ट) मुंबई महानगरातील आमदारांची बैठक बोलावली आहे. मुंबई महानगरातील भाजप आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस आज चर्चा करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर निवासस्थानी आज रात्री आठ वाजता ही आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीस हे भाजप आमदारांशी चर्चा करून आढावा घेणार आहेत. या बैठकीला मुंबईबरोबरच, शेजारचे ठाणे, नवी मुंबई आणि पालघर मतदारसंघातील आमदारांसोबत फडणवीस हे संवाद साधणार आहेत.

Devendra Fadnavis
Indapur Politics : विधानसभेचा मार्ग सुकर करण्यासाठी दत्तात्रेय भरणेंनी टाकला नवा डाव...

काही दिवसांपूर्वी पुण्यात महाराष्ट्र प्रदेश भाजपचे विशेष अधिवेशन झाले होते. त्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आक्रमक भाषण करत विधानसभा निवडणुकीसाठी आक्रमक भूमिका घेण्याचा सल्ला दिला होता. तसेच, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही भाजप कार्यकर्त्यांना फेक नॅरेटिव्हच्या विरोधात आक्रमकपणे उत्तर देण्याचे आवाहन केले होते.

या अधिवेशनाशिवाय मुंबईत नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही होत आहेत. त्यात निवडणूक स्ट्रॅटेजी ठरवली जात आहे. महायुती म्हणून भाजप शिवसेना अणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोबत घेऊन निवडणूक लढवणार आहे. मित्रपक्ष अजित पवार गटानेही राज्यात जनसन्मान यात्रा काढण्याचा निर्णय घेतला.

Devendra Fadnavis
Dilip Dhotre : राजसाहेबांनी, 33 वर्षांच्या एकनिष्ठेची पोचपावती दिली; विधानसभेची उमेदवारी जाहीर होताच दिलीप धोत्रेंची प्रतिक्रिया

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जनसन्मान यात्रा काढण्यात येत आहे. त्याची सुरुवात येत्या गुरुवारी (ता. 08 ऑगस्ट) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून करण्यात येणार आहे. त्यामुळे मित्रपक्षासोबत भाजपही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com