ठाकरे सरकारचे मंत्री ड्रग्स माफियांचे प्रवक्ते झाले का ?

मलिक हे शरद पवार यांच्यावतीने बोलतात की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचे स्पष्टीकरण ठाकरे व पवार यांनी करावे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

पुणे : कर्तव्य बजावणाऱ्या आधिकाऱ्यांवर चुकीचे आरोप करून त्यांचे खच्चीकरण करण्याचा उद्योग ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक करीत आहेत. मंत्री असलेले मलिक ड्रग्स माफियांचे प्रवक्ते आहेत का ? असा प्रश्‍न भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज उपस्थित केला.

समीर वानखेडे हा एक नंबरचा बोगस माणूस आहे.'एनसीबी'च्या माध्यमातून भाजपवाल्यांसाठी हजारो कोटींच्या वसुलीचा धंदा त्यांनी चालवला आहे. या सगळ्याचे पुरावे देऊन वानखेडेंची नोकरी घालवल्याशिवाय आणि त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय मी थांबणार नाही,' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गुरूवारी एका कार्यक्रमात दिला होता.

Kirit Somaiya
किरीट सोमय्या यांची नवाब मलिक यांना धमकी

मलिक यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज समाज माध्यमात उमटले. यावरून सोमय्या यांनी मलिक यांच्यावर थेट हल्ला केला. अंबरनाथ येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘मलिक हे राज्याचे मंत्री आहेत की नाही असा प्रश्‍न पडावा अशा पद्धतीने ते बोलत आहेत. मंत्री असूनही ते ड्रग्स माफियांचे प्रवक्ते असल्यासारखे वारंवार बोलत आहेत.त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे सरकारमधील कुणीही बोलायला तयार नाही.मलिक यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील यावर बोलत नाहीत याचा अर्थ पवार व ठाकरे यांचीच भाषा मलिक बोलत आहेत, असे समजावे का’’

Kirit Somaiya
लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा गाठणाऱ्या नव्या भारताची नवी प्रतिमा जगासमोर

मलिक हे शरद पवार यांच्यावतीने बोलतात की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने बोलत याचे स्पष्टीकरण ठाकरे व पवार यांनी करावे, असे आवाहन केले. व्यसन करताना काही तरूण पकडले गेले. ते गुन्हेगारी पाश्‍र्वभूमीचे आहेत असे मला म्हणायचे नाही. मात्र, आमदार-खासदारांनी केलेल्या कायद्याच्या आधारेच कोर्ट काम करीत आहे हे सर्वांनी ध्यानात घ्यायला हवे, असे सोमय्या यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com