किरीट सोमय्या यांची नवाब मलिक यांना धमकी

माजी खासदार आनंदराव अडसूळ चौकशीच्या भीतीने रूग्णालयात आहेत.
kirit somaiya.
kirit somaiya.Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : अंमला पदार्थ विरोधी विभागाचे प्रादेशिक संचालक (एनसीबी) समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागला तर नवाब मलिक तुमची खैर नाही, असा धमकीवजा इशारा भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार किरीट सोमय्या यांनी आज दिला.

अंबरनाथ येथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी आल्यानंतर ते आज पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘ ड्रग माफियांचे प्रवक्ते बनून नवाब मलिक वैयक्तिक टीका करणार असतील तर त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. ड्रग माफिया पुढची पिढी बरबाद करत असताना मलिक एक प्रकारे त्यांची बाजू घेत प्रामाणिक आधिकाऱ्याचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.मलिक यांना शाहरूख खान आणि त्याच्या मुलाबद्दल चिंता वाटते. या चिंतेपोटी तुम्ही प्रामाणिक आधिकाऱ्यावर एकप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहात.’’

kirit somaiya.
लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा गाठणाऱ्या नव्या भारताची नवी प्रतिमा जगासमोर

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पाठविलेल्या पत्राचा उल्लेख सोमय्या यांनी केला. ते म्हणाले, ‘‘ मला नौटंकीबाज म्हणणाऱ्या खासदार राऊत यांनी पत्रात माझे कौतुक केलेय.खासदार राऊत हे ठाकरे व पवार यांचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे या पत्रातील भाषा ठाकरे की पवारांची हे मला कळेना.मात्र, त्यांनी मला एक घोटाळा पाठवला. त्यांना मी २४ घोटाळ्यांची यादी पाठवायला तयार आहे. मी घोटाळ्याच्या मुळाशी जातो, असे खासदार राऊत म्हणत आहेत. त्याबद्दल धन्यवाद पण परमवीरसिंग व अनिल देशमुख कुठे आहेत हे तुम्ही सांगितले पाहिजे.’’

kirit somaiya.
अजित पवार म्हणाले; नो कॉमेन्टस् म्हणण्याचा आधिकार मला आहे की नाही

माजी खासदार आनंदराव अडसूळ चौकशीच्या भीतीने रूग्णालयात आहेत.त्यांना बाहेर काढा, अशी मागणीही त्यांनी केली. खासदार राऊत यांनी पत्रात कौतुक केलयं मात्र, तुम्ही माझे कौतुक करताय की ठाकरे सरकारमध्ये दम नाही हे सांगताय हे एकदा कळू द्या,असे आव्हान सोमय्या यांनी दिले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com