Solapur Congress : काँग्रेसची पडझड थांबेना...जिल्हाध्यक्षांपाठोपाठ माजी शहराध्यक्षांची पक्षाला सोडचिठ्ठी!

Solapur Political News : मोहिते पाटील यांच्यानंतर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनीही काँग्रेस सोडण्याची भूमिका घेतली आहे. ते तब्बल दहा वर्षे काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष होते. याशिवाय ते काँग्रेसच्या चिन्हावर महापालिकेत नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते.
Praniti Shinde-Sushilkumar Shinde
Praniti Shinde-Sushilkumar ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 02 January : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सोलापुरात जबरदस्त दणका बसला आहे, त्यातून काँग्रेस पक्षाची पडझड काही केल्या थांबायला तयार नाही. कारण, स्थानिक नेतृत्वाशी पटत नसल्याने जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्षपदापाठोपाठ आता काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे एकेकाळी जिल्ह्यात दबदबा असलेल्या काँग्रेसची परिस्थिती सध्या तोळामासाची झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने (Congress) सोलापूरची जागा जिंकली. विशेष म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट हे दोन मतदारसंघ वगळता सोलापूर दक्षिण, मोहोळ, पंढरपूर मंगळवेढा आणि सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला आघाडी मिळाली होती, त्यामुळे इच्छुकांची मोठी भाऊगर्दी विधानसभेला काँग्रेसकडे होती. मात्र, स्थानिक नेतृत्वाने जी राजकीय डावपेच आखायला पाहिजे होते, ते न आखल्याने पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व गाजविणाऱ्या काँग्रेस पक्षाचा एकही आमदार सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून निवडून येऊ शकलेला नाही. दक्षिण सोलापूर मतदारसंघाबाबत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर टीका जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेश कार्यालयाकडे सादर केला आहे.

Praniti Shinde-Sushilkumar Shinde
Dattatray Bharane : भरणेंच्या नाराजीची चर्चा वाढली; मंत्रिपदाचा पद्‌भार स्वीकारला नाही...आता कॅबिनेट बैठकीलाच दांडी!

राजीनामा देण्यापूर्वी धवलसिंह मोहिते पाटील यांनी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत आपला अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर केलेला आहे. त्या अहवालावर आणि मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर प्रदेश कार्यालयाने अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, मोहिते पाटील यांच्यानंतर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनीही काँग्रेस सोडण्याची भूमिका घेतली आहे. ते तब्बल दहा वर्षे काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष होते. याशिवाय ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर महापालिकेत नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांची सोलापूर शहर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी सलगी वाढली होती.

Praniti Shinde-Sushilkumar Shinde
Konkan Politic's : राजापुरात काहींनी विरोधकांना मदत करून शिवसेनेच्या विजयाची परंपरा खंडित केली; राजन साळवींचा रोख कोणाकडे?

तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मोची समाजाला सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने पाच माजी नगरसेवकांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय मुस्लिम समाजातील काही कार्यकर्त्यांनी पक्षापासून लांब जाणे पसंत केले आहे, त्यामुळे काँग्रेसची पडझड काही केल्या थांबायला तयार नसल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com