मुंबई : बाळासाहेबांशी दगाफटका करून मी बाहेर पडलो नाही. मी बाळासाहेबांना भेटून आणि सांगून बाहेर पडलो आहे. यामुळे नारायण राणे तसेच छगन भुजबळ यांच्या बंडाशी माझी तुलना करू नका, असे स्पष्ट मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. शिवसेना सोडून बाहेर पडल्याचे कारणे सांगताना राज ठाकरे म्हणाले, मी बाळासाहेबांशी दगाफटका करून बाहेर पडलो नाही. मी बाळासाहेबांना भेटून आणि सांगून बाहेर पडलो आहे. जेव्हा बाळासाहेबांना कळालं की हा काही पक्षात राहात नाही. माझी त्यांची शेवटची भेट होती. मी आजपर्यंत कधी बोललो नाही, अशी आठवण श्री. ठाकरे यांनी सांगितली.
राज ठाकरे म्हणाले, निघताना माझ्यासोबत मनोहर जोशी होते. जोशी बाहेर गेल्यावर बाळासाहेबांनी मला बोलावलं. हात पसरले मिठी मारली आणि म्हणाले, जा. तेथून बाहेर पडून कोणत्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर मनसे पक्ष उभा केला. सध्या गेल्या दोन तीन महिन्यांपासून जे राज्यात सुर आहे, ते महाराष्ट्रासाठी चांगल नाही. महाराष्ट्रात असं कधीही झालं नव्हते.
जो मतदार आहे, त्याने २०१९ ला मतदान केलं. त्याला कळलही नसेल आपण मतदान कुणाला केलं. कोण कुणात मिसळला आणि कोण कुणातून बाहेर आला. काहीच कळत नाही. हे जर खंर राजकारण वाटत असेल तर हे राजकारण नाही. ही तात्पुरती आर्थिक ॲडजेस्टमेंट आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
कोणाला तरी वाटलं म्हणून त्याने पक्ष बदलला, विधानसभा निवडणुकीच्या काळात सर्व निवडणुकीत या पक्षात तिकिट मिळालं नाही तर दुसऱ्या पक्षात जातात. मला लोकांची कमाल वाटते. त्यानंतर तुम्ही त्यांना मतदान कसे करता. २०१९ ला निवडणूका झाल्या भाजप सेना एकत्र लढले. त्यानंतर फारकत घेतली. अडीच वर्षाच्या मुद्द्यावर ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, ही गोष्ट तुमच्यात ठरली आहे. तर २०१९ ला तुम्ही मागणी करूच कशी शकता, असा प्रश्न त्यांनी शिवसेनेला केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.