मोठी बातमी! ठाकरे सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. हेमराज शाह यांचे 84 व्या वर्षी निधन

Mumbai Dr Hemraj Shah Dies News : ठाकरे सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. हेमराज शाह यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Mumbai Dr Hemraj Shah Dies News
Mumbai Dr Hemraj Shah Dies News Sarkarnama
Published on
Updated on

राजकीय क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ठाकरेसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष डॉ. हेमराज शाह यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रासह सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात अरविंद शाह आणि उदय शाह ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. हेमराज शाह हे केवळ राजकीय नेते म्हणून नव्हे, तर समाजसेवक, पत्रकार, लेखक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते म्हणूनही परिचित होते. महाराष्ट्रातील गुजराती समाजाला संघटित करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर महत्त्वपूर्ण योगदान दिले. बृहन्मुंबई गुजराती समाजाच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 139 गुजराती संस्थांचे फेडरेशन उभारले. समाजातील विविध प्रश्न आणि संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला.

Mumbai Dr Hemraj Shah Dies News
BJP Setback : नितेश राणेंच्या निकटवर्तीय नेत्याचा भाजपला धक्का! उपाध्यक्षासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम; युवा मोर्चाला मोठं खिंडार

‘कच्छ-शक्ती’ या वार्षिकाचे संपादक म्हणूनही डॉ. शाह यांनी दीर्घकाळ काम केले. या माध्यमातून कच्छी आणि गुजराती समाजातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना व्यासपीठ मिळाले. गुजराती भाषा, साहित्य आणि राजकारण या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी गुजराती भाषेत 19, मराठीत 8 आणि इंग्रजीत 2 पुस्तकांचे अनुवाद केले. याशिवाय गुजरातीतील 32 आणि मराठीतील 4 पुस्तकांचे संपादन केले.

महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या स्थापनेपासून तब्बल 35 वर्षे त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या पुढाकारातून जोगेश्वरी पश्चिम येथे सात मजली नवनीत गुजराती समाज भवन उभारण्यात आले. शिर्डीच्या साईबाबा संस्थानाचे विश्वस्त तसेच महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. विश्व गुजराती समाज, द बुक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कच्छ-शक्ती, उमरगाव गोशाळा आणि श्री वागड वीसा ओसवाल विकास समाज यांसारख्या संस्थांमध्ये त्यांचे योगदान राहिले.

Mumbai Dr Hemraj Shah Dies News
Assembly Election news : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी; ममतादीदींची प्रतिष्ठा पणाला, भाजपचा डाव फसणार की गड मजबूत होणार?

डॉ. हेमराज शाह यांच्या निधनाने ठाकरेसेनेसह महाराष्ट्रातील गुजराती समाज, सामाजिक, राजकीय, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याची आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाची आठवण दीर्घकाळ जपली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com