निष्ठेचा सागर उसळणार...! दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा टीझर लॉंच

Shivsena| Dasara Melava| शिवसेनेतील बंडाळीनंतर शिंदे गटाने शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी दावा केला होता.
Shivsena| Dasara Melava|
Shivsena| Dasara Melava|

मुंबई : दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी पहिला शिवेसेनेने पहिला टीझर लॉंच केला आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटकर अकाऊंटवर सेनेच्या दसरा मेळाव्याचा टिझर शेअर केला आहे. शिवसेनेच्या यापुर्वीच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर जमलेली गर्दी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यात दिसत आहेत.

'निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार' अशा ओळींनी टीझरची सुरुवात होते. त्यानंतर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचा वापर टीझरमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाजात 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो' अशी साद घालण्यात आली आहे. त्यासोबकच दसरा मेळावा, शिवसेनेच्या जाहीर सभेतील दृष्ये आणि शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, असे आवाहन शिवसैनिकांना करण्यात आले आहे.

Shivsena| Dasara Melava|
Solapur University : ‘सिनेट’ची मतमोजणी सुरू; अजिंक्यराणा पाटील, वैशाली साठेंसह उमेदवारांचे विद्यापीठात ठाण

शिवसेनेतील बंडाळीनंतर शिंदे गटाने शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी दावा केला होता. पण, मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्कचे मैदान देण्याचे आदेश दिले. तर शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटांनी आपापला मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. एकनाथ शिंदे गटाकडूनही काही तासांपूर्वीच त्यांच्या दसरा मेळाव्याचा टिझर लाँच करण्यात आला होता.

दरम्यान, मुळ शिवसेना कोणाची, हे प्रकरण अजून न्यायालयात असतानाच मुंबईत ऐतिहासिक दसरा मेळावा साजरा होत आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांना शिस्तीने आणि वाजत-गाजत येण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक करण्यासाठीही शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. पण यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने तीन हजार तर शिवसेनेकडून चौदाशे खासगी बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. दसऱ्याच्या दिवशी दुपारपर्यंत मुंबईत या गाड्या मुंबईत पोहचतील. तर दूरच्या म्हणजेच ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरुन येणाऱ्या गाड्या मंगळवारी रात्रीच मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com