सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर (Solapur) विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज (शुक्रवारी, ता. ३० सप्टेंबर) सकाळी दहापासून सुरवात झाली. सुरुवातीला विद्यापीठ शिक्षकांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यात खुल्या गटातून डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी प्रतिस्पर्धी डॉ. विकास घुटे यांचा पराभव केला. अनुसूचित जमाती प्रवर्गातून डॉ. विकास कडू यांनी प्रतिस्पर्धी डॉ. श्रीराम राऊत यांना पराभूत केले.
मतमोजणी होणार असल्याने सकाळपासूनच संस्था प्रतिनिधीतील उमेदवार माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांचे चिरंजीव अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (Baliram Sathe) यांच्या सून वैशाली साठे आदी उमेदवार विद्यापीठात ठाण मांडून बसले आहेत. (Solapur University : Counting of votes for Senate member election begins)
विद्यापीठ शिक्षक मतदारासंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाविद्यालयीन शिक्षक, संस्था प्रतिनिधी, अभ्यास मंडळ, ॲकेडमिक कौन्सिल यांची मतमोजणी सुरू झाली आहे. शेवटी पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगिनी घारे यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीसाठी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी विद्यापीठात उपस्थित आहेत. सायंकाळी सहापर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
‘संस्था प्रतिनिधी’मध्येही चूरस
संस्था प्रतिनिधीतून अजिंक्यराणा पाटील, वालचंद समुहाचे वैभव गांधी, स्वेरी कॉलेजचे डॉ. बब्रुवान रोंगे, डॉ. अनिल कुलकर्णी, वैशाली साठे हे पाच उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, संस्था प्रतिनिधीसाठी ५३ जणांनी मतदान केले आहे. पसंतीक्रमानुसार कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळणार आणि कोण बाजी मारणार, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.