ED Notice to Jayant Patil: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 'ईडी'ची नोटीस

NCP news सर्वोच्च न्यायालयात आज राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकालही लागणार आहे
Ncp State president Jayant Patil
Ncp State president Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

ED Notice to Jayant Patil : राज्यात एकीकडे सत्तासंघर्षाच्या निकालाची धाकधुक वाढली असताना एक मोठी बातमी समोर आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) नोटीस पाठवली आहे. सोमवारी (१५ मे) ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस पाठवल्याचे समोर येत आहे. (ED notice to NCP state president Jayant Patil)

प्रकरण नेमकं काय?

जयंत पाटील (Jayant Patil ) यांना आयएल आणि एफएलएस या प्रकरणी ईडी'ने नोटीस पाठवल्याचे सांगितले जात आहे. जयंत पाटील यांनी आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केल्याचे त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

Ncp State president Jayant Patil
Narhari Zirwal Statement: ''माझ्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर झालेला नाही!''; झिरवळांचं मोठं विधान

काही दिवसांपुर्वी या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही ईडी'ने चौकशी केली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. राज ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह यामध्ये अनेकांची नावे समोर आली होती. त्यामुळे आज ईडी'ने (ED) जयंत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. पण नोटीसीच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com